Marathi News> हेल्थ
Advertisement

Diabetes : मधुमेह झालाय म्हणून 'Sugar Free' चहा पिताय थांबा तुमच्यासाठी ठरू शकतं जीवघेणं

diabetics: मधुमेही रुग्ण साखर नको म्हणून बिना साखरेचा चहा घेतात पण, तुम्हाला माहित आहे का त्यामुळे तुमचं बरच नुकसान होऊ शकतं

Diabetes : मधुमेह झालाय म्हणून 'Sugar Free' चहा पिताय थांबा तुमच्यासाठी ठरू शकतं जीवघेणं

Diabetes tea : भारतात पाण्यानंतर प्यायला जाणारा सर्वात जास्त प्यायला जाणारा पदार्थ म्हणजे चहा (Tea Lovers in india ) . भारत चहाप्रेमींची संख्या बरीच आहे सकाळी उठल्याबरोबर हातात वाफाळता चहा हवाच, चहाच्या पहिल्या घोटानेच दिवसाची सुरवात रानरे आपल्याला बरेच भेटतील. 

जसा चहा पिणाऱ्यांची संख्या अधिक आहे तसेच, मधुमेह म्हणजे डायबिटीस ( diabetics ) रुग्णाचं प्रमाणसुद्धा भारत सर्वाधिक आहे. मधुमेहाचे असे अनेक रूग्ण आहेत ज्यांना चहा पिण्याची खुप सवय असते. मधुमेह झाल्यावर ही  सवय मोडू नये यासाठी अनेक रूग्ण विना साखरेचा चहा घेण पसंत करतात.

डायबिटीस रूग्णांची हीच सवय त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकते. 

आता तुम्हाला प्रश्न पडेल साखरेविना चहाच प्यायला तर काय नुकसान होईल हे शक्य नाहीये पण थांबा आता जी बातमी तुम्ही वाचणार आहात ती तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. (drinking sugar free tea in diabetics is harmfull here know the reason )

लोह शोषण्यात येते अडचण

चहामध्ये असलेले पॉलीफेनॉल आणि टॅनिन हे असे घटक आहेत जे शरीरात लोह पूर्णपणे शोषू देत नाहीत तसेच लोह शोषण्याच्या प्रक्रियेत व्यत्यय आणतात. तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की, जर लोक जेवणानंतर लगेच चहाचे सेवन करतात, तर त्यांना लोह शोषण्यास खूप त्रास होतो, तसेच त्यात आढळणारे कॅफिन हिमोग्लोबिन कमी करते.

जास्त चहा पिणे हानिकारक 

हवामान कोणतेही असो, पण जास्त प्रमाणात कोणत्याही गोष्टीचे सेवण करणे हानीकारक आहे. अशा परिस्थितीत जास्त प्रमाणात चहा पिणे हानिकारक आहे. जास्त  प्रमाणात चहा पिल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णाला खूप त्रास होतो. नुकसान होते ज्यामुळे पुन्हा साखर नियंत्रित करणे कठीण होते.

मधुमेहींसाठी दूध फायदेशीर  

कॅनडा युनिव्हर्सिटी ऑफ ग्वेल्फ आणी युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोच्या एका अभ्यासानुसार नाश्तामध्ये चांगल्या प्रतीच्या प्रोटीनयुक्त दूधाचा समावेश केल्याने मधुमेहींना फायदा होऊ शकतो. या प्रकाशित अहवालानुसार, नाश्त्यामध्ये बदल केल्याने टाईप 2 डाएबिटीजचा त्रासही आटोक्यात ठेवला जाऊ शकतो.  

दूधाचा फायदा

नाश्तामध्ये दूधाचा समावेश केल्याने रक्तातील ग्लुकोज नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. जर्नल ऑफ डेअरी सायन्समध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार योग्य वेळी दूधाचं सेवन केल्याने त्याचा आरोग्याला फायदा होतो. यामुळे कार्बोहायड्रेटचं पचन हळूहळू होण्यास मदत होते. परिणामी रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)

Read More