Marathi News> हेल्थ
Advertisement

आंबा खाल्ल्याने खरंच वजन वाढते का?

उन्हाळ्याच्या दिवसात घामामुळे, उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होते. 

आंबा खाल्ल्याने खरंच वजन वाढते का?

मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात घामामुळे, उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होते. मात्र असे असुनही या दिवसात मिळणार्‍या मुबलक आंब्यांसाठी अनेकांना उन्हाळ्याच्या दिवसांची प्रतिक्षा असते. फळांचा राजा समजला जाणारा आंबा चाखण्याचा मोह जसे जीभेचे चोचले पुरवतो तसेच तो आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आंबा खाण्याबाबत अनेकांच्या मनात शंका-कुशंका आहेत. आंबा खाल्ल्याने वजन वाढेल या भीतीने अनेकजण आंब्याची चव चाखण्याचा मोह आवरतात. पण त्याची खरंच गरज आहे का ? याबाबत तज्ञांनी काही खास सल्ला दिला आहे. 

आंब्याचे आरोग्यदायी फायदे - 

आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, आयर्न, कॉपर आणि पोटॅशियम घटक मुबलक प्रमाणात आढळतात. 

नैसर्गिकरित्या आंबा गोड असल्याने सकाळच्या वेळेस आंबा खाल्ल्याने तुमच्या दिवसाची सुरूवात प्रसन्न होते. 

आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी घटक मुबलक असल्याने शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारते. आंब्यामध्ये डाएटरी फायबर्सदेखील मुबलक प्रमाणात असतात. 

खरंच आंब्याने वजन वाढते का ? 

आहारतज्ञ सौम्या यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, आंबा हा नैसर्गिकरित्या गोड असल्याने आरोग्यासाठी फायदेशीर असला तरीही अतिसेवन हानीकारक आहे. आंबा खाताना कॅलरी काऊंटचा विचार करा. 

मध्यम आकाराच्या आंब्यामध्ये सुमारे 150 कॅलरीज असतात. तुमच्या आरोग्यानुसार गरजेपेक्षा अधिक कॅलरीजचे सेवन केल्यास वजन वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे अतिसेवन टाळा. 

आंबा रात्रीच्या जेवणात समाविष्ट करणं टाळा. मधल्या वेळेत लागणार्‍या भूकेच्या वेळेस आंबा खाणं अधिक फायदेशीर आहे. दिवसाच्या फर्स्ट हाफमध्ये आंबा खाणं अधिक हितकारी आहे.  मधूमेहींंनो ! आहारात आंंब्याचा 'असा' समावेश करणं आरोग्यदायी...

Read More