Marathi News> हेल्थ
Advertisement

Kidney Stone Foods: 'हे' पदार्थ खाऊ नका अन्यथा Kidney Stone धोका होऊ शकतो...

जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास होत असेल किंवा तुम्हाला ही समस्या कधीच येऊ नये असं वाटत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. यामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणत्या उपायांनी तुम्ही किडनी स्टोनची समस्या टाळू शकता.

Kidney Stone Foods: 'हे' पदार्थ खाऊ नका अन्यथा Kidney Stone धोका होऊ शकतो...

Kidney Stone Foods: अनेकांना किडनी स्टोनचा (Kidney Stone) त्रास होतो. स्टोन झाल्यावर लोक वेगवेगळी औषधे वापरतात. काही लोकांचे छोटे स्टोन बाहेर येतात. पण ज्या लोकांकडे मोठे स्टोन आहेत, त्यांना ऑपरेशन करूनच काढावं लागतात. पण तुम्हाला माहितीये का, किडनी स्टोन कसा बनतो?

स्टोन का तयार होतात?

स्टोन तयार होण्याचं कोणतही स्पष्ट कारण नाहीये. पण, असे काही मार्ग आहेत ज्याद्वारे स्टोन तयार होण्याची शक्यता कमी केली जाऊ शकते. हार्वर्ड मेडिकल स्कूलने (Harvard Medical School) स्टोनच्या निर्मितीबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यावरून असं स्पष्ट होतं की, आपण दररोज अशा अनेक गोष्टी करतो, ज्यामुळे स्टोन तयार होतात. या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

कॅल्शियम युक्त पदार्थ खा

असं दिसून आलं आहे की लोक कॅल्शियम युक्त पदार्थ खात नाहीत. पण कॅल्शियम युक्त गोष्टी खाल्ल्याने स्टोन होण्याची शक्यता कमी होते.

कमी प्रमाणात मीठ खा

जास्त मीठ खाल्ल्याने लघवीतील कॅल्शियमचे प्रमाण वाढते. त्यामुळे स्टोनचा धोका वाढतो. याशिवाय, कमी मीठ खाल्ल्याने रक्तदाबाचा धोकाही कमी होतो आणि हृदयाची गती व्यवस्थित राहते.

याशिवाय बीट, चॉकलेट, पालक, चहा इत्यादी पदार्थ खाल्ल्याने देखील किडनी स्टोन होण्याची शक्यता असते. या बाबी स्टोन बनवण्यासाठीही काम करतात. जर तुम्हाला मुतखडा असेल तर तुमचे डॉक्टर देखील अशा गोष्टी न खाण्याचा सल्ला देत असतील किंवा त्यांना कमी प्रमाणात खाण्यास सांगितलं जात असेल.

Read More