Marathi News> हेल्थ
Advertisement

डेंगीचा 'ताप' यंदा वाढण्याची शक्यता, व्हायरसचं नव रूप अधिक धोकादायक

पावसाळा आला त्यासोबत अस्वच्छता आणि त्यामधून वाढणारे साथीचे आजार बळावतात.

डेंगीचा 'ताप' यंदा वाढण्याची शक्यता, व्हायरसचं नव रूप अधिक धोकादायक

मुंबई : पावसाळा आला त्यासोबत अस्वच्छता आणि त्यामधून वाढणारे साथीचे आजार बळावतात. पावसाळ्यात अस्वच्छतेमुळे डेंगी पसरण्याचा धोका बळावतो. काही वर्षांपूर्वी देशभर डेंगीच्या साथीने हाहाकार पसरवला होता. मात्र आता डेंगी अधिक गंभीर स्वरूपात पसरण्याची शक्यता असल्याचे स्वास्थ्य विभागाने सांगितले आहे. एनवीबीडीसीपीने दिलेल्या अहवालानुसार, डेंगीशी सामना करण्यासाठी आता आरोग्य यंत्रणाला अधिक सक्षमपणे लढण्याची गरज आहे. डेंगीच्या या '5' गोष्टींंबाबत वेळीच व्हा सावध !

काय आहे धोका ? 

नॅशनल वेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम (NVBDCP)ने दिल्ली सरकार आणि दिल्ली नगर निगमला सावधानतेचा सल्ला दिला आहे. यंदा डेंगी अधिक गंभीर स्वरूपात समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

डेंगी दर 3 वर्षांनंतर अधिक तीव्रतेने हल्ला करतो. त्यामुळे यंदा डेंगीच्या डासांची आक्रमता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था सज्ज ठेवण्याची आणि सरकारसोबतच नागरिकांनी काळजी घेण्याची गरज वाढली आहे.  या '5' कारणांंमुळे विशिष्ट लोकांंनाच डास अधिक प्रमाणात चावतात !

काय आहेत उपाय ? 

दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागाने, दिल्लीमध्ये डेंगीशी सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. घरांमध्ये, कार्यालयांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी वेळोवेळी औषधांची फवारणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. नक्की वाचा : ताप नेमका डेंगी की चिकनगुनियाचा, हे कसं ओळखाल ...


एडीस एजिप्टी या डासामुळे जगभरात डेंगी, झिका, चिकनगुनिया यासरख्या जीवघेण्या आजाराची साथ पसरते.लोकांमध्ये डेंगी, चिकनगुनियाच्या साथीबाबत, त्यांच्या लक्षणांबाबत सजगता वाढवण्यासाठी काम सुरू करण्यात आलं आहे. जागोजागी औषध फवारणी केल्याने डासांचे लार्वा म्हणजेच अळ्यांना वेळीच नष्ट करण्यासाठी मदत होते. त्यामुळे भविष्यातील धोका रोखण्यास मदत होणार आहे.  डासांना पळवून लावतील हे घरगुती उपाय!

Read More