Marathi News> हेल्थ
Advertisement

Corona : मुंबईत रूग्णसंख्या पुन्हा 2 हजारांच्या पार, 95% रूग्ण मात्र Asymptomatic

मुंबईत रूग्णसंख्येने पुन्हा एकदा 2 हजारांचा टप्पा पार केला आहे.

Corona : मुंबईत रूग्णसंख्या पुन्हा 2 हजारांच्या पार, 95% रूग्ण मात्र Asymptomatic

मुंबई : राज्यात कोरोनाच्या रूग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसतेय. मुंबईत रूग्णसंख्येने पुन्हा एकदा 2 हजारांचा टप्पा पार केला आहे. बुधवारी मुंबईत कोरोनाचे 2293 नवे रुग्ण आढळलेत. गुरूवारी 84 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर 11 जणांना ऑक्सिजनची गरज होती. वेळी मुंबईत 1 रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

दरम्यान मुंबईतील रूग्णांमध्ये आढळून येणारी एक बाब म्हणजे, 96% रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसली नाहीत.

मुंबईत नोंदवलेल्या गेलेल्या कोरोनाच्या प्रकरणांमध्ये, बहुतेक रुग्णांना लक्षणं दिसून येत नाहीत. दररोज 94 ते 95% रुग्ण हे लक्षणविरहित असल्याची नोंद करण्यात आली आहे. 

दुसरीकडे कोरोनाने राज्यात हाहाकार माजवला आहे. राज्यात बुधवारी यंदाच्या वर्षातील विक्रमी रुग्णवाढ झाली आहे. नेहमीप्रमाणे राज्यातून मुंबईत सर्वाधिक रुग्णांचं निदान झालंय. बीए .5 या नव्या व्हेरिएंटचे रुग्णही आढळले आहेत. 

राज्यात काल दिवसभरात 4 हजार 255 कोरोनाचे नवे रूग्ण सापडले आहेत. तसेच नव्या व्हेरियंट BA.5 ची  दोघांना लागण झाली आहे. तर कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे.चिंताजनक बाब म्हणजे राज्यातील सक्रीय रुग्णांचा आकडा हा 20 हजार पार गेलाय. राज्यात सध्या 20,634 जणांवर रुग्णांवर कोरोना उपचार सुरु आहेत. 

Read More