Marathi News> हेल्थ
Advertisement

Health Benefits Of Coriander : 10 रुपयांची कोथिंबीर तुमच्यासाठी वरदान! फायदे जाणून व्हाल अवाक्

Health Tips : प्रत्येक घरातील स्वयंपाक घरात मिळणारा पदार्थ म्हणजे कोथिंबीर...कोथिंबरशिवाय कुठलाही पदार्थ अपूर्ण...अशी ही कोथिंबीर खाल्ल्यामुळे गंभीर आजारावर मात करु शकतो, हे तुम्हाला माहिती आहे का? 

Health Benefits Of Coriander : 10 रुपयांची कोथिंबीर तुमच्यासाठी वरदान! फायदे जाणून व्हाल अवाक्

Coriander Benefits : भाजी मार्केटमध्ये गेलो की आपण अनेक भाज्या घेतल्यावर आवर्जून घेतो तो पदार्थ म्हणजे 10 रुपयांची हिरवीगार कोथिंबीर (Coriander ) ...हा भाजीमधील (vegetables) सर्वात स्वस्त पदार्थ डोक्यापासून पायांपर्यंत प्रत्येक अवयवासाठी वरदान आहे. अनेक गंभीर आजारांवर (serious diseases) कोथिंबीर मात करु शकतो, हे तुम्हाला माहिती आहे का? या कोथिंबीरशिवाय आपली प्रत्येक डिश अपूर्ण असते. अशा या कोथिंबरचा फायदा आज आपण जाणून घेणार आहोत. (coriander many benefits for many serious diseases)

कोथिंबीर खाल्ल्यामुळे काय मिळतं?

कोथिंबीर खाल्ल्यामुळे आपल्या मुबलक प्रमाणात मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, जीवनसत्त्वे ए, बी, सी आणि के मिळतं. आयुर्वेदानुसार कोथिंबीर हे एक औषधी वनस्पती आहे. त्याचा रोज जेवण्यात समावेश करण्यास तज्ज्ञ सल्ला देतात. 

कोथिंबीर 'या' आजारांवर रामबाण!

1. कोथिंबीर ही एंजाइम्स अॅक्टिव्ह करण्यासाठी प्रभावी ठरते. ज्यामुळे आपल्या शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. 

2. जर तुम्ही कोथिंबीर आणि धणे एकत्र खाल्ल्यास शरीरातील अतिरिक्त सोडियम बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे तुमचं रक्तदाब (blood pressure) नियंत्रित राहतं. 

3. खराब कोलेस्ट्रॉल (Cholesterol) आणि एलडीएल (LDL) कमी करण्यासाठी देखील कोथिंबीर प्रभावी आहे. त्यामुळे हृदयविकाराचा धोका (Risk of heart disease) मोठ्या प्रमाणात कमी होतो.

4. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण कोथिंबीर ही सूज कमी करण्यासाठी वरदान आहे. 

5. रोगप्रतिकारक शक्ती (immune system) मजबूत करण्यासाठी ही अत्यंत उपयुक्त आहे. 

6. लिवरशी (Liver) संबंधित समस्यांसाठी कोथिंबीर किंवा धणे खूप फायदेशीर मानले जातात. 

7. कोथिंबीरीचे सेवन मूत्रपिंडासाठी (kidney) देखील खूप फायदेशीर आहे. 

8. हिरवीगार कोथिंबीर शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते.

9. हिरव्या कोथिंबीरमध्ये व्हिटामिन ए भरपूर प्रमाणात असल्याने ती डोळ्यांसाठी (eyes) खूप फायदेशीर आहे.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही.)

Read More