Marathi News> हेल्थ
Advertisement

Cholesterol कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट फायदेशीर? काय आहे सत्य?

चॉकलेट खाल्ल्याने तणाव कमी होतो आणि मानसिक आरोग्यही चांगलं राहतं

Cholesterol कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट फायदेशीर? काय आहे सत्य?

मुंबई : चॉकलेट (Chocolate) म्हटलं की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता पदार्थ आहे. चॉकलेट हा असा गोड पदार्थ आहे ज्याच्यापासून आपल्या शरीराला जास्त प्रमाणात ऊर्जा मिळते आणि शरीरातील साखरेची पातळी संतुलित राहण्यास (sugar level balanced) मदत होते. चॉकलेट खाऊन दिवसाची सुरुवात करणं चांगले असतं. चॉकलेट चवीला जितकं चांगले तितकेच त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत.

चॉकलेट खाल्ल्याने तणाव कमी होतो आणि मानसिक आरोग्यही चांगलं राहतं. चॉकलेट खाल्ल्याने रक्तदाबसारख्या समस्यांपासूनही तुमची सुटका होते. त्याचप्रमाणे कोलेस्ट्रॉल देखील कमी होण्यास मदत होते.

डार्क चॉकलेटचे आरोग्यदायी फायदे

हृदय निरोगी राहतं

डार्क चॉकलेटचे नियमित सेवन केल्यास हृदयाशी संबंधित आजारापासून आपण दूर राहतो. डार्क चॉकलेट खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका 50 टक्क्यांनी कमी होतो. 

रक्तदाबाची समस्या दूर होते

कमी रक्तदाबाची समस्या आजकाल अनेकांना त्रास देते. जर तुमचा रक्तदाब कमी असेल तर तुम्ही दररोज डार्क चॉकलेट खा. डार्क चॉकलेट आपला मूड सुधारण्यास मदत करते.

कोलेस्ट्रोल कमी करण्यास मदत

डार्क चॉकलेटच्या सेवनाने तुमच्या शरीरात कोलेस्ट्रोलचं प्रमाण कमी होते. शिवाय बर्‍याच संशोधनातून समोर आलं आहे की, डार्क चॉकलेटमुळे चांगलं कोलेस्ट्रॉल तयार करण्यास देखील मदत होते.

फॅट बर्न होतं

जर तुम्ही वाढत्या वजनामुळे कंटाळलेले असाल आहात तर डार्क चॉकलेट वजन कमी करण्यास मदत करू शकते. डार्क चॉकलेटमध्ये असलेली कोको पावडर शरीराची चरबी कमी करते. डार्क चॉकलेट खाताना एक गोष्ट लक्षात घ्यावी की, त्या चॉकलेटमध्ये 60 टक्के कोकोचे प्रमाण असलं पाहिजे.

Read More