Marathi News> हेल्थ
Advertisement

Child Mental Health : भयंकर! सर्दी- खोकल्यानंही तुमच्या मुलांना येऊ शकतं डिप्रेशन

पावसाळ्यात किंवा इतर कोणत्याही ऋतूमध्ये ही सर्दी खोकल्यासारख्या व्याधी जडणं हे अत्यंत सामन्य आहे. बदलतं वातावरण आणि वाढत्या प्रदुषणामुळे अनेकांना सर्दी खोकल्याचा त्रास होतो. मात्र याच सामान्य व्याधी आता मानसिक आरोग्य खराब होण्यामागचं कारण ठरत आहेत हे सिद्ध होत आहे.   

Child Mental Health : भयंकर! सर्दी- खोकल्यानंही तुमच्या मुलांना येऊ शकतं डिप्रेशन
Updated: Jul 04, 2024, 10:41 AM IST

स्पर्धेच्या युगात प्रत्येकाचा वैयक्तिक संघर्ष सुरु आहे. बदलती जीवनशैली आणि फास्टफुडचा विपरित परिणाम हा शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्यावर ही होत आहे. तज्ज्ञांच्या मते, गेल्या तीन ते चार वर्षांत मानसिक समस्येने ग्रासलेल्या रुग्णांच्या संख्येत 60 टक्क्यांची वाढ झाली आहे. या सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे  11 ते 16 वयोगटातील नैराश्याने ग्रासलेल्यांची संख्या जास्त आहे. फिनलँड विद्यापिठाने मांडलेल्या संशोधनानुसार लहान मुलांमध्ये डिप्रेशनची वाढ झपाट्याने होत आहे. जसं सर्दी आणि खोकल्याचं इन्फेक्शन पसरतं जातं, त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये डिप्रेशन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 

मानसिक ताण तणाव वाढला की, त्याचा परिणाम शरीरावर देखील जाणवतो. वेळेत न जेवणं, जेवताना खाण्याकडे लक्ष न देणं यामुळे शरीराच्या वाढीसाठी हवे असलेले आवश्यक घटक अंगी लागत नाही. बऱ्याच जणांना तणावामध्ये असल्यावर जेवण जात नाही, त्यामुळे जरा काही खाल्लं तरी उलट्या होतात, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. याचा परिणाम म्हणजे शरीराला  बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेण्यात अडचणी येतात.   

लहान मुलांमध्ये वाढणारी डिप्रेशनची लक्षणं 

  • सतत थकवा येणं 
  •  भूक न लागणं 
  • पुरेशी झोप न घेणं 
  • चिडचिड होणं 
  • आत्महत्याचे विचार मनात येणं 
  • सतत डोकं दुखणं 

डिप्रेशनची कारणं 
अनुवंशिकता : दमा, फिट येणं हे शारीरिक आजार अनुवंशिक असतात तसंच काही मानसिक आजारदेखील अनुवंशिक असतात. जर कुटुंबातील कोणी मानसिक नैराश्यातून जात असेल तर हाच आजार पुढील पिढीमध्ये येण्याची शक्यता जास्त असते. 

लहान वयात दु:ख पचवणं  
लहान मुलांचं मन नाजूक असतं. कमी वयातच जवळचं कोणी दुरावलं, अभ्यासाचं दडपण,  कोणी जवळचं जगातून निघून गेलं तर याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम होतो. लहान मुलं मनातलं पटकन कोणाल सांगत नाही. त्यामुळे लहान वयातच मानसिक नैराश्य येण्याचं प्रमाण वाढत आहे. 

काय म्हणतात डॉक्टर?
पालकांची भूमिका 
डॉक्टरांच्या मते पालकांनी जास्तीत जास्त वेळ आपल्या मुलांना देणं गरजेचं आहे. सध्याच्या काळात आई वडील दोघंही कामावर जात असल्याने पालकांचा सहवास मुलांना फारसा मिळत नाही. त्यामुळे पालकांनी मुलांशी जास्तीत जास्त वेळ घालवणं महत्त्वाचं आहे. 

आहारावर विशेष लक्ष देणं 
फास्टफूडमुळे शरीरातील उष्णता वाढते, त्यामुळे चिडचिडेपणा जास्त वाढतो. मुलांच्या आहारात दही साखरेचा समावेश करावा. दही थंड असल्या कारणाने हृदयावर येणारा ताण कमी होतो. नैराश्याने ग्रासलेल्या मुलांची त्वचा कोरडी पडते. त्यामुळे भरपूर पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. मुलांच्या वागण्यात वेगळेपण जाणवत असेल तर लवकरात लवकर मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे.