Marathi News> हेल्थ
Advertisement

Cholesterol In Chicken: चिकन खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या आरोग्यदायी उपाय

चिकन खाऊन आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल तर वाढणार नाही ना? असा प्रश्न सतावत असतो. चला तर मग आज जाणून घेऊयात चिकन खाल्ल्याने नेमकं काय होतं?

Cholesterol In Chicken: चिकन खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या आरोग्यदायी उपाय

Will Chicken Increase Cholesterol: भारतात शाकाहारी आहार घेणाऱ्यांच्या तुलनेत मांसाहारी आहार घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. 2015-16 च्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेच्या आधारे भारतात 78 टक्के महिला आणि 70 टक्के पुरुष मांसाहार करतात. मांसाहारात सर्वाधिक पसंती ही चिकनला दिली जाते. कारण यात फॅट रेड मीट तुलनेनं कमी असतं आणि स्वस्त देखील आहे. पण मांसाहार घेणाऱ्यांना सर्वाधिक चिंता असते ती कोलेस्ट्रॉलची. त्यामुळे चिकन खाऊन आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल तर वाढणार नाही ना? असा प्रश्न सतावत असतो. चला तर मग आज जाणून घेऊयात चिकन खाल्ल्याने नेमकं काय होतं?

रेड मीटमध्ये असलेल्या सॅच्युरेटेड फॅटमुळे कोलेस्ट्रॉल वाढतो. त्यामुळे बहुतांश आहारतज्ज्ञ चिकनला मांसाहारातील आरोग्यदायी अन्न मानतात. चिकनमुळे शरीराला प्रोटीन मिळतं. पण कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त खाल्ल्यास नुकसान होतं. चिकन देखील असंच आहे. चिकन शिजवण्यासाठी जास्त प्रमाणात तेल, बटर वापरलं तर कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. कारण यात सॅच्युरेटेड फॅट असतं आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं. बटर चिकन, चिकन चंगेजी, कढाई चिकन आणि अफगानी चिकनमुळे फॅट वाढतात. 

चिकनमुळे कोलेस्ट्रॉल वाढू नये यासाठी काही खास रेसिपी सिलेक्ट करू शकता. चिकन सूप, कमी तेलात शिजवलेली चिकन तंदूरी, कोळशावर शिजवलेलं चिकन कबाब यासाखरे पदार्थ खाऊ शकता. 

चिकनमध्ये कोणते पोषक घटक असतात? जाणून घ्या

  • प्रथिने - 27.07 ग्रॅम
  • कोलेस्ट्रॉल - 87 मिग्रॅ
  • चरबी - 13.5 ग्रॅम
  • कॅलरीज - 237 मिग्रॅ
  • कॅल्शियम - 15 मिग्रॅ
  • सोडियम - 404 मिग्रॅ
  • व्हिटॅमिन ए - 160 मायक्रोग्राम
  • लोह - 1.25 मिग्रॅ
  • पोटॅशियम - 221 मिग्रॅ


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंबण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

Read More