Marathi News> हेल्थ
Advertisement

फ्लोअलेस स्किन हवीये?आजपासूनच खाण्याच्या' या' सवयी बदला, न्यूट्रिशनिस्टने सांगितले सिक्रेट

आपल्या त्वचेमध्ये स्वतःला पुन्हा टवटवीत करण्याची शक्ती असते

फ्लोअलेस स्किन हवीये?आजपासूनच खाण्याच्या' या' सवयी बदला, न्यूट्रिशनिस्टने सांगितले सिक्रेट

Skincare tips:  ग्लोइंग स्किनच्या हव्यासापोटी लोक महागड्या क्रिम्स आणि ट्रीटमेंट्सवर किती खुप पैसे खर्च करतात माञ आपण आहारासारख्या मूलभूत गोष्टींबद्दल सावधगिरी बाळगल्याशिवाय खरी नैसर्गिक चमक मिळवणं कठीण आहे. त्यामुळे ग्लोइंग स्किनसाठी काय खावे आणि काय खाऊ नये याची काळजी घेणं खुप महत्वाच आहे.

यामुळेच लोक आपली त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी भरपूर पैसा खर्च करतात. यातील काही रक्कम क्रीम्सवर, तर काही सौंदर्य उपचारांवर खर्च केली जाते. मात्र, सत्य हे आहे की जोपर्यंत आहाराच्या सवयी बदलल्या जात नाहीत, तोपर्यंत फ्लोअलेस स्किनचं स्वप्न साकार होणं कठीण आहे.जेव्हा सौंदर्याचा विचार केला जातो तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट जी भूमिका बजावते ती म्हणजे स्किन टाईप. 

आपल्या त्वचेमध्ये स्वतःला पुन्हा टवटवीत करण्याची शक्ती असते. वाढत्या वयात त्वचेवर सुरकुत्या आणि डाग दिसू लागतात. दिसण्याबरोबरच त्वचेचा पोतही बदलू लागतो. कालांतराने, त्वचेची स्वतःची दुरुस्ती करण्याची क्षमता देखील कमी होऊ लागते. म्हणूनच आपण दररोज आपल्या त्वचेची थोडी अधिक काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

न्यूट्रिशनिस्टच्या मते रोज एक ग्लास भाज्यांचा रस प्यायला हवा.  गाजर, टोमॅटो आणि बीटरूटचा रस स्किन आणि किडनीतील विषारी पदार्थ साफ करतो. वनस्पती-आधारित आहार शरीराला व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई आणि सेलेनियम  , जे एजिंग कमी करुन नवीन सेल्स निर्माण करण्यात मदत करतात.

या गोष्टी ताबडतोब थांबवा

हेल्दी स्किनसाठी न्यूट्रिशनिस्ट धूम्रपान सोडण्याचा सल्ला देतात. यामुळे त्वचेचं खूप नुकसान होतं. यासोबतच तळलेले आणि जास्त तिखट पदार्थ न खाण्याचा सल्लाही देतात. जे शरीर आणि त्वचेसाठी चांगलं नाहीये.

चमकदार त्वचा मिळविण्यासाठी सोप्या टिप्स

फॅट इंन्टेक कमी करण्याचा सल्ला दिला जातो.यासोबतच ग्लोइंग स्किनसाठी हेल्दी फॅट्स असलेले पदार्थ आहारात वाढवावेत, यामध्ये विशेषत: मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आणि ओमेगा फॅटी अॅसिड जसे की फिश ऑइल, ऑलिव्ह ऑइल, कॅनोला ऑइल आणि अक्रोड्स यांचा समावेश होतो.

आहारात हे खायला विसरु नका 
ग्लोईंग स्किन मिळविण्यासाठी आहारात फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स वाढवण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी त्यांनी फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य खाण्यास सांगितलय. हे body system डिटॉक्सिफाईड होण्यास मदत करतात. यासोबतच प्रोसेस केलेलं अन्न सोडून घरचे अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. सोबत व्हिटॅमिन-ए, बी, सी, ई, झिंक, गॅमा लिनोलेनिक अॅसिड घेण्याचा सल्लाही दिला जातो. 
 

Read More