Marathi News> हेल्थ
Advertisement

Carrot juice benefits: गाजरचा ज्यूस पिण्याचे फायदा जाणून घ्याल तर नेहमी प्याल

carrot juice benefits for skin : अनेक समस्यांवर गाजर रामबाण उपाय आहे. जाणून घ्या त्याचे जबरदस्त फायदे.

Carrot juice benefits: गाजरचा ज्यूस पिण्याचे फायदा जाणून घ्याल तर नेहमी प्याल

Carrot juice : वजन कमी करण्यासाठी लोकं अनेक गोष्टी पाळत असतात. पहिली गोष्ट म्हणजे जेवणावर कंट्रोल. अनेक जण जेवण कमी करतात. अनेक जण जास्त फॅट असलेल्या गोष्टी खाणे टाळतात. पण असं करत असताना तुम्हाला योग्य डाएट माहित असणं खूप आवश्यक आहे. अन्यथा तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक आणि घरगुती गोष्टी करु शकतात.

गाजर खावून तुम्ही तुमचं वजन नियंत्रित करु शकतात. गाजर खाण्याचे तसे अनेक फायदे आहेत. गाजर खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात अनावश्यक चरबी जमा होत असेल तर ती कमी होण्यास मदत होते. गाजरांमध्ये जीवनसत्त्वे A, C, K, B8, झिंक, लोह यासह अनेक पोषक घटक असतात.

गाजरच्या ज्यूसचे फायदे

1. गाजरचा ज्युस व्हिटॅमिन ए चा चांगला स्रोत आहे. ज्यामुळे त्वचेवर खूप चमक येते. गाजरचा रस प्यायल्याने चेहऱ्यावरील मुरुम आणि काळे डाग निघून जातात. डोळ्यांची दृष्टी चांगली राहते.

2. गाजराचा ज्युस शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता पूर्ण करतो. अॅनिमियाचा त्रास असलेल्या लोकांसाठी गाजराचा ज्युस फायदेशीर आहे आणि याच्या सेवनाने शरीरात रक्त लवकर तयार होते. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे शरीराची पचनशक्ती वाढते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येत आराम मिळतो.

3. गाजराच्या रसात बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात आढळते. हे तुम्हाला तणाव आणि चिंतामुक्त ठेवते. वाढत्या नैराश्याच्या लक्षणांपासून आराम मिळतो. गाजराचा ज्युस साखर आणि काळी मिरी मिसळून प्यायल्याने कफचा त्रास कमी होतो.

Read More