Marathi News> हेल्थ
Advertisement

मडक्यातील पाणी पिण्याचे ५ फायदे

आजकाल अनेकांच्या घरात फ्रिज आहे. त्यामुळे उन्हातान्हातून आल्यावर आपल्यापैकी अनेक लोक फ्रिजमधील थंड पाणीच पिण्याला लोक प्राधान्य देतात. पण, लक्षात घ्या फ्रिजमधील थंड पाणी पिणे आरोग्यास तितके हितावाह नाही. पण, याउलट जुनं ते सोनं असं म्हणत तुम्ही जर मडक्यातील पाणी प्यालयात तर तुम्हाला ५ आरोग्यदाई फायदे होऊ शकतात.

मडक्यातील पाणी पिण्याचे ५ फायदे

मुंबई : आजकाल अनेकांच्या घरात फ्रिज आहे. त्यामुळे उन्हातान्हातून आल्यावर आपल्यापैकी अनेक लोक फ्रिजमधील थंड पाणीच पिण्याला लोक प्राधान्य देतात. पण, लक्षात घ्या फ्रिजमधील थंड पाणी पिणे आरोग्यास तितके हितावाह नाही. पण, याउलट जुनं ते सोनं असं म्हणत तुम्ही जर मडक्यातील पाणी प्यालयात तर तुम्हाला ५ आरोग्यदाई फायदे होऊ शकतात.

जाणू घ्या कोणते आहे ते ५ फायदे

नैसर्गिक घटक शरीरास मिळतात

मडके हे मातीचे असते. मातीत असा गुण असतो जो पाण्याला शुद्ध करतो. पाण्यातील अशुद्ध घटक माती शोषून घेते. त्यामुळे नैसर्गिक पोषक तत्वाचा फायदा शरीराला मिळतो.

पचनव्यवस्था मजबूत होते

मडक्यातील पाणी प्यायल्यामुळे शरीरातील टेस्टोस्टेरोनची मात्राही वाढते. मडक्याचे पाणी शरीरातील पचनसंस्ता मजबूत करण्यासाठीही फायदेशीर राहते. 

अॅसिडीटीवर गुणकारी

मडक्यातील पाणी हे अॅसिडीटीमुळे पोटात, छातीत होणारी जळजळ कमी करण्यास मदत करते. 

घसा चांगला राहतो

फ्रिजमधील पाणी पिल्यावर अनेकांचा घसा बसतो. पण, मडक्यातील थंड पाणी जर तुम्ही प्याल तर, तुमच्या घशाला आराम मिळतो. त्यामुळे घसा राहण्यासाठी मडक्यातील पाणी पिणे फायदेशीर राहते.

गरोदरावस्थेतही फायदा

फ्रिजमधील थंड पाणी पिणे हे अनेकदा गरोदर महिलांना हानिकारक असते. पण, मडक्यातील पाण्याचे विशेष साईट इफेक्ट्स नसतात. त्यामुळे गरोदरावस्थेतही मडक्यातील पाणी पिण्याचा फायदा मिळतो.

Read More