Marathi News> हेल्थ
Advertisement

चहात मिसळा 'हा' एक पदार्थ; अ‍ॅसिडिटीवर रामबाण, सकाळी पोटदेखील होईल साफ

Benefits Of Drinking Tea Mixed With Ghee: चहात तूप टाकून प्यायल्याने आरोग्यासाठी काय फायदे होतात, हे जाणून घेऊया. 

चहात मिसळा 'हा' एक पदार्थ; अ‍ॅसिडिटीवर रामबाण, सकाळी पोटदेखील होईल साफ

Benefits Of Drinking Tea Mixed With Ghee: अनेकांची सकाळची सुरुवात ही नेहमी चहाने होते. पण तुम्हाला माहितीये का चहामध्ये एक पदार्थ मिसळून प्यायल्यास अनेक आजारांवर मात करता येते. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात कॉफी किंवा चहात तूप मिसळून पित असल्याचे दाखवण्यात आले होते. या व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता. सोशल मीडियात चहात तूप टाकून पिण्याची क्रेझ वाढत आहे. सकाळी एक कप चहा तर सगळेच पितात. मात्र, चहात दूध टाकू नका. चहात तूप टाकून पिणे खरंच फायदेशीर आहे का? जाणून घेऊया. 

चहात तूप टाकून पिण्याचे फायदे

एका अहवालानुसार, तूपात खूप जास्त मात्रेत अँटीऑक्सीडेंट असतात. त्याचबरोबर हेल्दी फॅट्सदेखील असतात. ज्यामुळं शरीर डिटॉक्स करण्यास मदत होते. तूपात असेही काही गुणधर्म असतात जे पोषण शरीरात शोषून घेण्यास मदत होते. त्याचबरोबर पोटाचे पीएच बँलेन्स 
राखलं जातं. 

जेव्हा तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी चहा पितात तेव्हा अनेकदा अॅसिडिटीची समस्या होते. अशावेळी जर तुम्ही चहात थोडंस तूप टाकल्यास दूधात असलेले अॅसिडिटी निर्माण करणारे गुणधर्म कमी करतात. यात इंफ्लेमेशन आणि अपचन निर्माण करणारी समस्या दूर होते. 

तूप पोटाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. जेव्हा तुम्ही तुपात थोडीसी हळद मिक्स करता तेव्हा ते अधिक आरोग्यदायी बनते. हे तुमच्या शरीरात निर्माण होणारे फ्री रेडिकलमुळं निर्माण होण्यापासून बचाव करते. 

ज्या लोकांना गॅस, अपचन यासारख्या समस्या आहेत. त्यांनी गरम पाण्यात तूप टाकून प्या. यात नैसर्गिक पद्धतीने लॅक्सेटिव्ह गुणधर्म असतात. जे बाऊल मुव्हमेंट निरोगी करते. इर्रिटेबल बाउल सिंड्रोमच्या समस्येवर खूप फायदेशीर आहे. जर तुम्ही बद्धकोष्ठतेमुळं त्रासलेले आहात तर तुमच्यासाठी दूध आणि तूपाचे कॉम्बिनेशन खूप फायदेशीर ठरु शकते. 

जर तुम्ही तूप दूध किंवा दूधाच्या चहात मिक्स करुन पित असाल तर त्यामुळं युरिक अॅसिडची मात्राही कमी होते. शरीरात असलेले फॅट झरझर वितळण्यास मदत होते. अशातच चहात थोडे तूप टाकून पिण्यास अनेक फायदे मिळतात. 

या लोकांनी तूपाचे सेवन करु नये?

ज्या लोकांचे वजन आधीच जास्त आहे. म्हणजेच ओव्हरवेट आहे आणि लठ्ठपणा वाढत आहे. फॅटी लिवरने ग्रस्त आहेत. अशा लोकांनी तूपाचे सेवन अधिक करण्यापासून टाळले पाहिजे. तूप जास्त खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची लेव्हल वाढते जे हृदयासाठी हानिकारक आहे. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

Read More