Marathi News> हेल्थ
Advertisement

Belly Fat : वजन वाढीची चिंता आता सोडा; व्यायाम न करताही कमी करा बेली फॅट

Weight Loss Tips : कामासाठी बैठी जीवनशैली ( Sedentary lifestyle ) देखील वजन वाढवते. वजन वाढलं की, डाएट ( Diet ) आणि जीम यांच्यावर भर दिला जातो. बेली फॅट कसं कमी करावं यासाठी आम्ही काही खास टीप्स सांगणार आहोत. 

Belly Fat : वजन वाढीची चिंता आता सोडा; व्यायाम न करताही कमी करा बेली फॅट

Weight Loss Tips : आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा ( Obesity ) वाढण्याची समस्या अनेकांमध्ये दिसून येते. अवेळी आणि अयोग्य खाणं याला अधिक कारणीभूत आहे. याशिवाय कामासाठी बैठी जीवनशैली ( Sedentary lifestyle ) देखील वजन वाढवते. वजन वाढलं की, डाएट ( Diet ) आणि जीम यांच्यावर भर दिला जातो. मात्र आज आम्ही तुम्हाला व्यायाम न करता बेली फॅट म्हणजेच पोटावरील चरबी कमी करण्याबाबत माहिती देणार आहोत.

व्यायामाशिवाय पोटाची चरबी ( Belly Fat ) कमी करणे हे एक मोठं आव्हान आहे. मुळात ज्यावेळी तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमच्या शरीराची हालचाल होते. शारीरिक हालचाली कॅलरी बर्न ( Calories burn ) होते आणि परिणामी वजन कमी होतं. मात्र आजकाल कामाच्या व्यापामुळे वर्कआउटसाठी वेळ मिळत नाही. अशा व्यक्तींना बेली फॅट कसं कमी करावं यासाठी आम्ही काही खास टीप्स सांगणार आहोत. 

योग्य आहार

फीट आणि फाईन राहण्यासाठी आहार खूप महत्त्वाचा आहे. संतुलित आणि पौष्टिक आहार घेणं आवश्यक आहे. जर तुम्हाला व्यायामाशिवाय वजन कमी करायचंय तर असेल तुमच्या आहारात भरपूर फळं, भाज्या, संपूर्ण धान्य, प्रथिने यांचा समावेश करा. 

हाइड्रेशन

अनेकांना माहिती नसेल पण पाणी हे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी भरपूर फायदेशीर ठरतं. निरोगी राहण्यासाठी, दिवसभर पुरेसं पाणी पिणं खूप महत्वाचे आहे. पाणी तुमच्या शरीरात चयापचय वाढवण्यास मदत करतं. ज्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होते.

फायबर युक्त पदार्थ

तुमच्या आहारात उच्च फायबरयुक्त अन्नपदार्थ समावेश करा. ज्यामुळे तुमच्या शरीरातून फॅट कमी होण्यास मदत होईल. ज्यामध्ये संपूर्ण धान्य, शेंगा, फळं आणि भाज्या समाविष्ट करा. 

स्ट्रेस मॅनेजमेंट

जास्त ताण हे वजन आणि पोटावरील चरबी वाढण्याचं मुख्य कारण ठरतं. ताण कमी करण्यासाठी स्ट्रेस मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. 

पुरेशी झोप घ्या

पुरेशी झोप घेणं हे निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर असतं. रात्री तुम्हाला पुरेशी आणि चांगली झोप मिळेल याची खात्री घ्यावी. झोपेच्या कमतरतेमुळे हार्मोनच्या पातळीत फरक पडतो आणि परिणामी वजन वाढू शकतो.

रात्री स्नॅक्स खाऊ नये

अवेळी जेवणं ही सवय फार चुकीची आहे. यामुळे वजन वाढण्याची समस्या सुरू होते. त्यामुळे रात्री उशिरा खाणं टाळलं पाहिजे. रात्रीच्या वेळेस जास्त जेवण किंवा स्नॅक्स टाळा. रात्री उशिरा जेवण केल्याने वजन वाढू शकते.

साखर कमी खा

साखरेचा समावेश असलेले पदार्थ आणि पेये कमी करावी. गोड पदार्थांमुळे वजन वाढण्यास आणि पोटावरील चरबीला कारणीभूत ठरू शकतात.

Read More