Marathi News> हेल्थ
Advertisement

केळ्यामध्ये आहेत हे चमत्कारी गुण, त्वचा आणि केसांना असे चमकवा

केळ्यामध्ये पौष्टिक गुणांचा खजिना असतो त्यामुळे केळ्याला पोषक आहारही म्हटले जाते.  

केळ्यामध्ये आहेत हे चमत्कारी गुण, त्वचा आणि केसांना असे चमकवा

मुंबई : केळ्यामध्ये पौष्टिक गुणांचा खजिना असतो त्यामुळे केळ्याला पोषक आहारही म्हटले जाते. यात एक नाही तर शेकडो चांगले गुण असतात. केळ्याचे झाड, साल, पाने अथवा कच्ची केळी या सगळ्याचा वापर कशानाकशासाठी होतो. केळ्याच्या वापराने अनेक आजार दूर केले जातात. याच्या वापराने त्वचा, केस चमकू लागतात. 

सतत कलर आणि केमिकल्सचा मारा केल्याने केसांचा पोत बिघडतो. तुमचे केस राठ झाले असतीर तर एक केळे कुस्करुन त्यात एक चमचा ग्लिसरीन अथवा मध टाकून पॅक केसांना लावा.

शरीराचा एखादा भाग भाजल्यास त्यावर केळे लावा. यामुळे जळजळ कमी होते. पिकलेले केळे कुस्करुन भाजलेल्या भागावर लावल्याने लगेच आराम पडतो.

केळ्यामध्ये व्हिटामिन सी, ए, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अधिक असते. जे त्वचेसाठी फायदेशीर. केळे एक चांगले मॉश्चरायझरही आहे. 

घरच्या घरी केळ्याचा फेसपॅक बनवण्यासाठी एक चतुर्थांश पिकलेले केळे घ्या. त्यात एक चमचा मध आणि अर्धा चमचा दही मिसळा. याला चांगले मिक्स करुन चेहऱ्यावर फेस पॅकप्रमाणे लावा. साधारण १०- १५ मिनिटांनी कोमट पाण्याने धुवून चेहरा पाण्याने साफ करा.

Read More