Marathi News> हेल्थ
Advertisement

Bajra Roti Benefits : आज जेवणात पोळीऐवजी बनवा 'ही' भाकरी; आजारपणं दूर पळालीच म्हणून समजा

Bajra Roti Benefits : फक्त थंडीच्याच दिवसांमध्ये नव्हे, तर रोजच्या आहारामध्येसुद्धा तुम्ही पोळीऐवजी भाकरीला प्राधान्य देऊ शकता. शरीराला होणाऱ्या फायद्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.   

Bajra Roti Benefits : आज जेवणात पोळीऐवजी बनवा 'ही' भाकरी; आजारपणं दूर पळालीच म्हणून समजा

Bajara Roti Benefits: थंडी सुरु झाली की आपल्या घरात खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये काही महत्त्वाचे बदल केले जातात. अनेकदा हे बदल असे असतात की, ते लक्षात येत नाहीत. पण, त्याचे फायदे मात्र फार मोठे असतात. आपल्या ताटात येणारी भाकरी किंवा पोळी तुम्ही कधी निरखून पाहिलीये का? त्याचे फायदे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का? किंबहुना रोजच्या गव्हाच्या पिठापासून तयार करण्यात आलेल्या चपातीऐवजी (Wheat Roti) तुम्ही कधी भाकरीला (Bajra Roti) प्राधान्य दिलंय का? (forget wheat chapati Millet roti and Benefits In Winter)

हिवाळ्यात का खावी भाकरी? 

हिवाळ्यामध्ये आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावतात. त्यातच काहींना हृदयविकार (Heart Issues) किंवा मधुमेहाचा (Diabetes) धोकासुद्धा सतावतो. यासाठी आहारामध्ये ऋतूनुसार बदल केलं जाणं अतिशय महत्त्वाचं आहे. तापमानाचा पारा दिवसागणिक खाली जात असतानाच आहारामध्ये शरीराला ऊब देणाऱ्या पदार्थांचा समावेश करणं हा एक उत्तम पर्याय ठरतो. यात बाजरीचं (Millet) नाव पुढेच असतं. 

बाजरीमध्ये असणारी प्रथिनं (Proteins), तंतुमय पदार्थ (Fiber), रोगप्रतिकारक घटक (Antioxidents), झिंक, लोह (Iron), विटामीन बी 3, बी 6 आणि बी 9 अशी तत्त्वं शरीराला फायदेशीर ठरतात. त्यामुळं ग्लुटन (Gluten) असणाऱ्या गव्हापेक्षा बाजरी कधीही उत्तम पर्याय ठरते. यामध्ये असणाऱ्या घटकांमुळं शरीरात रक्तपुरवठा सुरळीत राहतो. शिवाय रक्तदाबही नियंत्रणात राहतो. थोडक्याच हृदयविकारांना सहज दूर ठेवता येतं. 

हेसुद्धा वाचा : Drumstick Benefits: आरोग्यवर्धक शेवग्याच्या शेंगा, फायदे वाचाल तर बसेल आश्चर्याचा धक्का

 

बाजरीची भाकरी किंवा बाजरीची खिचडी (Bajra Khichdi) खाल्ल्यानं शरीराला आवश्यक ग्लुकोजचा पुरवठा होतो. रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं. बाजरीची भाकरी खाल्यानं भूक भागते आणि नियंत्रणातही राहते. त्यामुळं अवाजवी आहाराचा मारा शरीरावर होत नाही परिणामी वजन नियंत्रणात राहतं. 

बाजरीमध्ये असणारे काही घटक पचनक्रीया सुधारण्यास मदत करतात जिथं गव्हाच्या पिठाची चपाती पचण्यास जड असते तिथं भाकरी पचण्यास तुलनेनं हलकी असते. त्यामुळं अपचनाचे त्रासही होत नाहीत. शरीराची उत्सर्जन प्रक्रीयाही यामुळं सुधारते. शरीरातील नसा आकुंचन पावणं, सर्दी- थंडी भरणं या अशा समस्याही बाजरीची भाकरी दूर करते. त्यामुळं रोजच्या जेवणात चपातीऐवजी बाजरीची भाकरी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. 

Read More