Marathi News> हेल्थ
Advertisement

ब्रश करूनही तोंडांचा वास येत असेल तर लगेचच सोडा 'या' सवयी

तुमच्या या सवयींमुळेही तुम्ही ब्रश करूनही तुमच्या तोंडाचा उग्र वास येऊ शकतो

ब्रश करूनही तोंडांचा वास येत असेल तर लगेचच सोडा 'या' सवयी

Health News : बर्‍याचदा तुम्ही दररोज चांगले ब्रश केल्यानंतरही तुमच्या तोंडाचा वास येतो.  तुमच्या काही सवयींमुळेही तुम्ही ब्रश करूनही तुमच्या तोंडाचा उग्र वास येऊ शकतो. या नक्की कोणत्या सवयी आहेत ज्याने तुमच्या तोंडात दुर्गंध येतो ते पाहूयात-

पाणी कमी पिणे-
आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली तर डिहायड्रेशनमुळे त्रास होतो. तोंडातील लाळसुद्धा कमी प्रमाणात होते. त्यामुळे कोरड्या तोंडात जंतूंची संख्या झपाट्याने वाढू लागते. कधीकधी अन्न दातांमध्ये अडकतं आणि दाताला कीड लागते. यासाठी पुरेसं पाणी पिणं सर्वात महत्त्वाचे आहे. जेवणानंतर कोमठ पाण्यात मीठ टाकून त्याच्या गुळण्या करा जेणेकरून तोंडाची दुर्गंधी कमी होते. 

झोप आणि एंटी डिप्रेशनची औषधं-
ज्या लोकांना रात्री झोप येत नाही किंवा त्यांना डिप्रेशनचा त्रास होतो ते झोपेच्या औषधांची मदत घेतात. मात्र या गोळ्या तोंडाला दुर्गंधी येण्याचं कारण ठरतात. झोपताना नारळ किंवा लिंबूपाण्याचं सेवन करा. तुमचं मन शांत ठेवा आणि कोणताही तणाव घेऊ नका. यामुळे तुम्हाला मनःशांती मिळेल आणि तोंडाची दुर्गंधीही नाहीशी होईल.

 कॉफी-
भारतात कॉफीप्रेमींची कमतरता नाही, पण त्यांची ही सवय नुकसानीचं कारण बनते. या कॉफीमध्ये कॅफीन मुबलक प्रमाणात आढळते. कॅफीन आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण वेगानं कमी करतं. पाण्याचं प्रमाण कमी झाल्यावर तोंडातीळ लाळेची मात्रा कमी होते आणि तोंडाचा वास येऊ लागतो. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Read More