Marathi News> हेल्थ
Advertisement

पुरुषांच्या पाठदुखीची कारणं तुम्हालाही आश्चर्यचकित करतील, याकडे दुर्लक्ष करु नका

चला जाणून घेऊया की पुरुषांमध्ये पाठदुखी आणखी कोणत्या कारणामुळे होऊ शकते.

पुरुषांच्या पाठदुखीची कारणं तुम्हालाही आश्चर्यचकित करतील, याकडे दुर्लक्ष करु नका

मुंबई : आपल्यापैकी बऱ्याच लोकांना पाठ दुखीची तक्रार अनेकदा जाणवते. बराच वेळ एकाच ठिकाणी बसून काम केल्यामुळे पाठदुखीची तक्रार उद्भवू शकते. परंतु या व्यतिरीक्त पाठ दुखण्याचे आणखी काही कारणं देखील असू शकतात. सामान्यतः शरीरात पोषक आहार न मिळाल्याने पाठदुखीची तक्रार असते, पण पुरुषांना पाठदुखी होण्यामागे यापेक्षा वेगळी कारणं समोर आलेली आहे. जी महिलांपेक्षा वेगळी आहेत. चला जाणून घेऊया की पुरुषांमध्ये पाठदुखी आणखी कोणत्या कारणामुळे होऊ शकते.

पुरुषांमध्ये पाठदुखीची कारणे

- कोणत्याही प्रकारच्या संसर्गामुळे पाठदुखीची तक्रार उद्भवू शकते.

- याशिवाय मणक्याची समस्या असली तरी पाठदुखीची तक्रार असू शकते.

- जास्त वजन उचलल्यामुळेही पाठदुखीचा तक्रार उद्भवू शकतो.

- संधिवात किंवा संधिरोग असल्यास, पाठदुखी किंवा सूज येण्याची शक्यता असते.

- याशिवाय झोपेशी संबंधित काही समस्या असल्यास पाठदुखीची तक्रार असू शकते.

- जर पुरुषांना लघवीला त्रास होत असेल तर ते पाठदुखीचे लक्षण असू शकते.

पाठदुखीवर उपचार

सर्व प्रथम, पाठदुखी असल्यास, तुम्हाला तुमचे पोश्चर म्हणजेच शरीराचं वागणं, चालणं बदलावं लागेल. कारण असे केल्याने अनेक प्रकारच्या समस्या दूर होऊ शकतात.

याशिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याने इंजेक्शन किंवा औषध घेता येते.

जर तुम्हाला पाठदुखी असेल तर तुम्ही हीटिंग पॅडने ते कमी करु शकता.

पाठदुखी दूर करण्यासाठी योगासने, व्यायामाचा पर्याय देखील एक उत्तम पर्याय आहे.

Read More