Marathi News> हेल्थ
Advertisement

पोटात बाळ आईला का मारतात किक? जाणून घ्या काय आहे कारण

त्यामागे काय कारण आहे, यात काही संकेत तर नसतात ना...तर चला आज आपण जाणून घेऊयात की, पोटात बाळ का मारतात लाथ...

पोटात बाळ आईला का मारतात किक? जाणून घ्या काय आहे कारण

Baby Kick In Pregnancy: बॉलिवूड अभिनेता आमीर खानचा (Aamir Khan)  3 इडियट्स (3 idiots) चित्रपट आठवतो तुम्हाला...त्यातील एक फेमस डायलॉग होता ऑल इज वेल...ज्यावेळी अभिनेत्री मोना सिंह (Mona Singh) गर्भवती (pregnant) असताना पोटातील बाळ ऑल इज वेल म्हटल्यावर लाथ मारतं, हे पाहून आमीर खान आणि करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) हैराण होऊन जातात. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला का, पोटात बाळ आईला लाथ का मारतं. त्यामागे काय कारण आहे, यात काही संकेत तर नसतात ना...तर चला आज आपण जाणून घेऊयात की, पोटात बाळ का मारतात लाथ...

आई होणे हा आयुष्यातील सर्वात सुंदर आणि आनंदादायी क्षण असतो. पण तेवढाच तो नाजूक काळ असतो, कारण महिलेला गर्भात एका जीवाला मोठं करायचं असतं. एक आई गर्भातील बाळाच्या पहिल्या चाहुलची आतुरतेने वाट पाहत असते. ती पहिली किक आईच्या आनंदाचा त्यावेळी थारा नसतो. तज्ज्ञांनुसार गर्भातील बाळाची हालचाल हे त्याचं निरोगी असण्याचं लक्षण असतं. पण पोटात असताना बाळ आईला का लाथ मारते आणि ते कधीपासून मारायला सुरुवात करतं याबद्दल आपण जाणून घेऊयात. 

क्विकनिंग म्हणजे काय (Quickening)

क्विकनिंग म्हणजे सामान्य भाषेत बाळ पोटात लाथ मारणे असा होतो... गर्भधारणेच्या 20-22 आठवड्यांत पहिल्यांदा बाळ आईला लाथ मारतं . दुसरीकडे, जेव्हा एखादी स्त्री दुसर्‍या किंवा तिसर्‍यांदा गरोदर राहते, तेव्हा तिला 16-18 आठवड्यांतच याचा अनुभव येतो. गर्भधारणेच्या सातव्या किंवा आठव्या महिन्यात, ही हालचाल खूप वेगवान होते. परंतु गर्भधारणेच्या 36-37 आठवड्यांत, गर्भातील बाळाचे वाढते वजन, कमी द्रवपदार्थ आणि गर्भाशयात कमी जागा उपलब्ध असल्यामुळे ही हालचालही कमी होते.

गर्भाशयात बाळाच्या हालचालीची कारणे (Causes of baby movement in the womb)

गर्भधारणेदरम्यान बाळाला वेगवान किंवा हालचाल करण्याचे कारण भिन्न असू शकतात. असं म्हटलं जातं की गर्भाशयात बाळ सांधे ताणण्यासाठी हालचाली करतात, उचकी मारतात, डोळे मिचकावतात, लाथ मारतात. (baby kicks during pregnancy nmp)

रात्रीच्या वेळी बाळाची हालचाल असते जास्त?

अनेक गरोदर स्त्रिया म्हणतात की बाळ रात्रीच्या वेळी गर्भात जास्त हालचाल करतात. यात तसं काळजी करण्यासारखं काही नाही. काही मुले रात्री जास्त लाथ मारतात, काही दिवसा. बाळाच्या हालचाली कधीही हानिकारक किंवा चिंतेचे कारण नसतात. रात्री किंवा दिवसा दोन्ही हालचाली पूर्णपणे सामान्य आहेत.

हालचालीकडे लक्ष द्या

गरोदरपणाच्या सातव्या महिन्यात डॉक्टरही बाळाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देतात. जरी बाळ गर्भाशयात बराच काळ झोपत असले तरी, तरीही प्रत्येक अर्ध्या तासाने त्यांची हालचाल होणे आवश्यक आहे, जे आईला जाणवते. प्रसूतीची वेळ जसजशी जवळ येते तसतशी बाळाची हालचालही बदलते.

अन्यथा ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा

वेळोवेळी डॉक्टर गर्भवती महिलेला बाळाच्या तपासणीसाठी बोलावतात. पण जर कोणी तुमच्या मुलाला चांगले ओळखत असेल तर ते तुम्ही आहात. न जन्मलेल्या बाळाच्या बाबतीत जेव्हा तुम्हाला काही अस्वस्थता जाणवते तेव्हा लगेच डॉक्टरांची मदत घ्या. त्याची अजिबात वाट पाहू नका. 

Read More