Marathi News> हेल्थ
Advertisement

पायांच्या सूजण्यावर कोरफड एकच रामबाण उपाय

कोरफडमध्ये अनेक पेषक तत्वे असतात

पायांच्या सूजण्यावर कोरफड एकच रामबाण उपाय

मुंबई : पायांना सूज येण्यामागे अनेक कारणे आहेत. अधिक काळ उभे राहणे, पायाला काही दुखापत होणे, पायामधून रक्त येणे इ. त्यामुळे पायांच्या दुखण्याच्या समस्या वाढतात. चालताना देखील अनेक त्रास होतो. आशा त्रासापासुन सुटका करून घेण्यासाठी लोक औषधांचा वापर करतात. औषधांच्या वापरामुळे योग्य फायदा होत नाही. त्यासाठी एक घरगुती उपाय नक्कीच करून पाहा. कोरफडच्या वापरामुळे ही समस्या कमी होण्याची शक्यता आहे. आपल्या रोजच्या जीवनात कोरफडचे अनेक फायदे आहेत

कोरफडमध्ये अनेक पेषक तत्वे असतात
कोरफडमध्ये विटॅमिन्स, एन्जाइम्स, सॅलिसिलिक अॅसिड, अॅन्टीऑक्सीडेंट, मिनरल्स, अमीनो अॅसिड हे पोषक तत्वे मोठ्या प्रमाणात अढळतात.

कोरफडच्या पाण्यात काही वेळ पाय ठेवल्यास अत्यंत फायदा होतो. लागणारे साहित्य
- कोमट पाणी
- कोरफडचा गर
- मॉइश्चराइजर

एका बादलीमध्ये कोमट पाणी घ्या, त्यामध्ये कोरफडचा गर एकजीव करून घ्या. आता या पाण्यात अर्ध्या तासासाठी पाय राहू द्या. काही वेळा नंतर पायांना मॉइश्चराइजर लावा.  

Read More