Marathi News> हेल्थ
Advertisement

केस गळण्याची समस्या आहे? आहारात या गोष्टींचा समावेश करा

केस गळण्याची समस्या मोठी अडचण ठरत आहे. 

केस गळण्याची समस्या आहे? आहारात या गोष्टींचा समावेश करा

नवी दिल्ली : आजकल केस गळण्याची समस्या अतिशय वाढली आहे. पुरुष, महिला दोघांमध्येही केस गळण्याची समस्या मोठी अडचण ठरत आहे. केस विरळ होणं किंवा केस गळणं याला एलोपेसिया म्हटलं जातं. केस गळती ही अनेक कारणांनी होऊ शकते. केस गळणं हे अनुवंशिक, तणाव, पोषक तत्वांची कमी, प्रदूषण, अधिक काळ उन्हात राहणं, रक्ताची कमी यांसारख्या अनेक कारणांमुळे होऊ शकते. केसांवर अत्याधिक रसायनांचा उपयोग केल्यानेही हेयरफॉल होण्याचा धोका असतो. दररोजच्या जेवणात काही प्रमाणात बदल केल्याने केस गळती कमी होण्यास मदत होऊ शकते. 

अक्रोड (Walnuts) - 

केस गळती थांबवण्यासाठी अक्रोड महत्त्वाची भूमिका निभावू शकतो.  दररोज सकाळी ५-७ अक्रोड खाल्याने केसांसाठी याचा फायदा होऊ शकतो. याच्या सेवनाने केस अधिक मजबूत, चमकदार आणि लांब होण्यास मदत होऊ शकते. अक्रोडमध्ये ओमेगा-६, फॅटी अॅसिड, झिंक, आर्यन, व्हिटॅमिन बीसह मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं. दररोज आहारात अक्रोड सामिल केल्याने शरिरावर त्याचा चांगला परिणाम दिसू शकतो.

पेरु (Guavas) - 

पेरुमध्ये सी व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणात असतं. पेरू केसांच्या वाढीसाठी आवश्यक कोलेजन (प्रोटीनचा एक प्रकार) वाढवण्यास मदत करते. पेरुच्या सेवनाने केसांच्या वरचा भाग मजबूत राहतो. केस नाजूक होण्यापासून रोखण्यास, पेरु गुणकारी ठरु शकतो.

गाजर (Carrots) -

गाजर डोळ्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे ते केसांसाठीही गुणकारी आहे. गाजरात व्हिटॅमिन ए असतं. जे टाळूला उत्तम पोषण देतं. गाजराच्या सेवनाने केसांची मुळं मजबूत होण्यास मदत होते. 

  

ओट्स (Oats) -  

ओट्समध्ये फायबर, झिंक, आर्यन, ओमेगा-६, फॅटी अॅसिड यांसारखे पोषण तत्व आढळतात. ओमेगा-६, फॅटी अॅसिड डोक्याची त्वचा, केसांची वाढ आणि त्यांना टिकवून ठेवण्यास मदत करतात. आठवड्यातून प्रत्येक दोन दिवसांनंतर ओट्स खाणं फायदेशीर ठरु शकतं.

जव (Barley) - 

जवमध्ये व्हिटॅमिन-ई, लोह मोठ्या प्रमाणात आढळतं. लोह शरीरातील लाल रक्तपेशी टिकवून ठेवण्यास मदत करते. याच्या सेवनाने केसांची मुळे मजबूत होतात. त्यामुळे केस गळती कमी होण्याची शक्यता असते.

Read More