Marathi News> हेल्थ
Advertisement

ओमायक्रॉनसाठी नवीन लस शोधलीच पाहिजे; तज्ज्ञांचा सूचक इशारा

ओमायक्रॉनचा प्रसार जसा वाढला तसं लसीकरण झालेल्या लोकांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बूस्टरचा वापर केला जाऊ लागला.

ओमायक्रॉनसाठी नवीन लस शोधलीच पाहिजे; तज्ज्ञांचा सूचक इशारा

मुंबई : कोरोना व्हायरच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटशी लढण्यासाठी जगभरात बूस्टर डोस देण्याचं धोरण अवलंबलं जातंय. दरम्यान प्रतिष्ठित नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात, वॅक्सिन एक्सपर्टने असं म्हटलंय की, बूस्टर डोसवर काम करण्याऐवजी आपण आता अशा लसी तयार करणयावर भर दिला पाहिजे जी कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटशी लढू शकेल. 

मॅसॅच्युसेट्स-आधारित रॅगन इन्स्टिट्यूटचे इम्युनोलॉजिस्ट एलेजांद्रो बालाज म्हणतात की, "ओमायक्रॉन व्हेरिएंटने बूस्टर डोसबद्दलची पद्धत बदलली आहे. यापूर्वी, संसर्गाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती लसीकरण केलेल्या व्यक्तीइतकी मानली जात होती. परंतु ओमायक्रॉन सारख्या अत्यंत संसर्गजन्य व्हेरिएंट आल्यानंतर, हे स्पष्ट झालंय की, यापूर्वी संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शरीरात संसर्गाशी लढण्याची क्षमता नाही."

ओमायक्रॉनचा प्रसार जसा वाढला तसं लसीकरण झालेल्या लोकांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बूस्टरचा वापर केला जाऊ लागला. अशा प्रकारे, संसर्गाची प्रकरणं कमी करण्याचा आणि रुग्णालयांवरील भार कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला जो यशस्वी देखील झाला. परंतु बूस्टर डोसची एक प्रमुख चिंता ही आहे की, तो फक्त संक्रमणाला फार काळ प्रतिबंधित करू शकत नाही.

ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स युनिव्हर्सिटीचे संसर्गजन्य रोग प्रतिकारशक्ती तज्ज्ञ माइल्स डेव्हनपोर्ट म्हणतात की, सध्याच्या लसींचे बूस्टर डोस वारंवार दिल्याने कोरोनाच्या येणाऱ्या व्हेरिएंटविरोधात प्रतिकारशक्ती कमी होईल.

Read More