Marathi News> हेल्थ
Advertisement

तरुणाला 'नेटफ्लिक्स'चं व्यसन पडलं महागात

ताण कमी करण्यासाठी या तरुणानं 'नेटफ्लिक्स' व्हिडिओजचा आधार घेतला, पण... 

तरुणाला 'नेटफ्लिक्स'चं व्यसन पडलं महागात

मुंबई : आत्तापर्यंत तुम्ही तंबाखू, सिगरेट, दारू इतकंच काय तर इंटरनेटच्या व्यसनांबद्दलही ऐकलं असेल... पण भारतात पहिल्यांदाच 'नेटफ्लिक्स' या ऑनलाईन व्हिडिओ स्ट्रिमिंग चॅनलचं व्यसन लागल्याचं प्रकरण समोर आलंय. बंगळुरूमध्ये एका तरुणाला या व्यसनाला हॉस्पीटलमध्ये दाखल करावं लागंलय. डॉक्टरही या तरुणाच्या वेगळ्याच व्यसनामुळे चिंतेत आहेत. 

बंगळुरूच्या राष्ट्रीय मानसिक स्वास्थ्य आणि न्यूरोसाइन्स (NIMHANS)मध्ये सध्या या तरुणावर उपचार सुरू आहेत. 

आपलं व्यसन धोकादायक ठरू शकतं, याची जाणीव झाल्यानंतर या २६ वर्षीय तरुणानं स्वत:हूनच डॉक्टरांना संपर्क केला होता. 

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्यंत कमी वयातच या तरुणानं आपला व्यवसाय सुरू केला होता. परंतु, काही कारणानं व्यवसायही त्याला बंद करावा लागलाय. त्यानंतर कुटुंबाकडून या तरुणावर करिअरवर लक्ष देण्याचा दबाव वाढू लागला... 

आपला ताण कमी करण्यासाठी या तरुणानं 'नेटफ्लिक्स' व्हिडिओजचा आधार घेतला... पण, तणाव कमी होतोय असं वाटत असतानाच या तरुणाला 'नेटफ्लिक्स'चं व्यसनच लागलं. हा तरुण दिवसातले जवळपास ८-१० तास 'नेटफ्लिक्स' व्हिडिओज पाहण्यात घालवतो. 

नेटफ्लिक्स हा एक ऑनलाईन व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म आहे. जवळपास २ वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली. त्यावेळी, त्याच्या लायब्ररीमध्ये एकूण ८२६ व्हिडिओ होते... आज ही संख्या ४७०६ वर गेलीय. नेटफ्लिकसचे युझर्स भारतात वेगानं वाढताना दिसतेय. येत्या ३-४ वर्षांत युझर्सची संख्या १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.   


 

Read More