Marathi News> हेल्थ
Advertisement

नियमित जॉगिंग करण्याचे 5 मोठे फायदे

नियमित जॉगिंग करा आणि फीट राहा

नियमित जॉगिंग करण्याचे 5 मोठे फायदे

मुंबई : उत्तम आरोग्यासाठी आहाराप्रमाणे व्यायामही तितकाच महत्त्वाचा असतो. योगा, जिम या माध्यमातून अनेक जण स्वत:ला फीट ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. झुंबा डान्ससारखा पर्यायही काही जण स्विकारतात. पण काही जण जॉगिंग करुन स्वतःला फीट ठेवतात. जॉगिंग केल्याने आरोग्याला मोठा फायदा होतो.

1. वजन कमी होते - 

जॉगिंग केल्यामुळे शरीरातील चरबी घटवण्यास मदत होते. चरबी घटण्याचा वेग जॉगिंगमुळे वाढतो. वजन कमी करण्यासाठी हा सर्वात सोपा उपाय आहे.

2. मानसिकरित्या फिट 

शरिरासह मानसिकरित्या फीट राहण्यासाठी जॉगिंग करणं तितकचं महत्त्वाचं ठरतं. जॉगिंगमुळे आपण फ्रेश राहतो आणि याचा परिणाम म्हणजे आपला आत्मविश्वास वाढतो. यामुळे मानसिकरित्या ही छान वाटतं.

3. डायबेटीसवर उपाय

एकीकडे डायबेटीसचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असताना जॉगिंग केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो.

4. प्रतिकारशक्ती वाढते

व्यक्तीची प्रतिकारशक्ती जेवढी चांगली असेल तेवढा व्यक्ती फीट राहतो. जॉगिंग केल्यामुळेही प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

5. हृदयाचं आरोग्य

नियमित जॉगिंग केल्यास तुमचं हृदय हे आरोग्यदायी राहते. जॉगिंगमुळे हृदयाशी संबधित आजार दूर राहतात. यामुळे रक्तदाब सुरळीत राहतो.

Read More