Marathi News> मनोरंजन
Advertisement

Zero Teaser : सलमान खानला Kiss करताना शाहरूख खान

अफलातून टीझर 

Zero Teaser : सलमान खानला Kiss करताना शाहरूख खान

मुंबई : शाहरूख खानचा आगामी सिनेमा 'झिरो'चा टीझर लाँच झाला आहे. या टीझरमध्ये सलमान आणि शाहरूख दोघंही एकत्र दिसत आहेत. हा सिनेमा 10 डिसेंबर रोजी रिलीज होणार असून या मध्ये अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ लीडरोलमध्ये दिसत आहेत. शाहरूख खान पहिल्यांदा या सिनेमांत बुटक्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहरूख खानच्या झिरोबाबत प्रेक्षकांना मेकिंगपासूनच क्रेझ आहे. नुकताच रिलीज केलेल्या या टीझरमध्ये शाहरूखचा हा हटके अंदाज बघून प्रेक्षक आणखीन उत्सुक झाले आहेत. 

हा सिनेमा डिसेंबरमध्ये रिलीज होणार असल्यामुळे प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे. शाहरूख खान ईदचा सण आपल्या चाहत्यांना रिकामा घालवू देत नाही. या सणाचे औचित्य साधून शाहरूख सिनेमाचे टिझर रिलीज केले आहे.  ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी हा टिझर लाँच केलं आहे. 

70 करोडमध्ये VFX झिरो या सिनेमांत शाहरूख खान बुटका दाखवण्यात आला आहे. शाहरूखला बुटका करण्यासाठी खास 400 लोकांची vfx ची टीम तयार करण्यात आली. शाहरूखची कंपनी रेड चिलीजकडे याच्या vfx ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या सिनेमातील स्पेशल इफेक्ट करता तब्बल 70 करोड रुपये खर्च केले आहेत. बाहुबली सिनेमानंतर स्पेशल इफेक्ट्समध्ये झिरो हा सिनेमा दुसऱ्या नंबरवर असणार आहे. मात्र असं असलं तरीही शाहरूख या ग्राफिक्सकरता खूष नसल्याचं सांगण्यात येत आहे.

Read More