Marathi News> मनोरंजन
Advertisement

'तुम्ही पठाणसारखे चित्रपट करायला हवे...', नेटकऱ्याच्या सल्ल्यावर आमिरनं दिलं सडेतोड उत्तर

Aamir Khan : आमिर खाननं सोशल मीडियावरून साधला चाहत्यांशी संपर्क, यावेळी नेटकऱ्यानं दिलेल्या सल्ल्यावर आमिरनं घेतलं शाहरुखचं नावं अन् म्हणाला...

'तुम्ही पठाणसारखे चित्रपट करायला हवे...', नेटकऱ्याच्या सल्ल्यावर आमिरनं दिलं सडेतोड उत्तर

Aamir Khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला कोणत्याही ओळखीची गरज नाही. आमिर त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या दमदार चित्रपटांसाठी ओळखला जातो. आमिर वर्षातून एक किंवा दोन चित्रपट करत असला तरी नेहमी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो. मात्र, त्याच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटाला पाहिजे तेवढं प्रेम प्रेक्षकांकडून मिळालं नाही. त्यानंतर आमिर एक प्रोड्युसर म्हणून एक चित्रपट घेऊन आला आहे. त्या चित्रपटाचं नाव 'लापता लेडीज' आहे. या चित्रपटाचं प्रमोशन करताना आमिर दिसतो. त्यासाठी नुकताच तो लाइव्ह आला होता. त्या दरम्यान, त्याच्या चाहत्यांनी त्याला विविध प्रश्न विचारले. एका चाहत्यानं आमिरला शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाला घेऊन प्रश्न विचारला ज्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले.

आमिर खानचं लाइव्ह सेशन हे चांगलंच चर्चेत आहे. या दरम्यान, आमिरला चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. त्याचे आमिरनं प्रेमानी उत्तरं दिली. लाइव्ह सेशनमध्ये आमिरला एका चाहत्यानं सांगितलं की 'तू पठाणसारखे चित्रपट करायला हवे. त्यावर उत्तर देत आमिरनं जे उत्तर दिलं त्यानं सगळ्यांची मने जिंकली. आमिरनं त्याचा जवळचा मित्र शाहरुख खानविषयी म्हटलं की यार शाहरुख बनवतोय ना पठाणसारखे चित्रपट. मी लापता लेडीजसारखे चित्रपट बनवतो. तुम्ही तो बघा ना.'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंद कार्यक्रम गुजरातच्या जामनगरमध्ये साजरा करण्यात आला. अंबानी यांच्या या पार्टीत फक्त भारतातील नाही तर परदेशातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. याच कार्यक्रमात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. त्यांच्या परफॉर्मन्सची चांगलीच चर्चा रंगली होती. या पार्टीत तिन्ही खान म्हणजेच शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांनी एकत्र येऊन डान्स केला होता. हे सगळ्यांसाठी असलेलं सरप्राईज होतं. 

हेही वाचा : '35 शी ओलांडली... अजून लग्न नाही, कसं होणार?' जुई गडकरीनं केला कठीण काळाविषयी खुलासा

दरम्यान, 2022 मध्ये काजोलच्या ‘सलाम वॅन्की' च्या स्क्रीनिंग दरम्यान, आमिर खाननं अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी म्हटलं होतं की मी आता काहीच करत नाही. मी गेल्या अनेक वर्षांपासून सतत काम करतोय. सध्या, मला माझ्या कुटुंबासोबत वेळ व्यथित करायचा आहे. मी एका वर्षानंतर पुन्हा अभिनय करेन. 

Read More