Marathi News> मनोरंजन
Advertisement

दयाबेनचा इतका बोल्ड लूक पाहून चाहते हैराण; पाहा व्हिडिओ

दयाबेन यांच्या दोन खासियत आहेत, एक त्यांचा आवाज आणि दुसरा त्यांचा गरबा. 

दयाबेनचा इतका बोल्ड लूक पाहून चाहते हैराण; पाहा व्हिडिओ

मुंबई : दयाबेन यांच्या दोन खासियत आहेत, एक त्यांचा आवाज आणि दुसरा त्यांचा गरबा. पण गरबा सोडून दयाबेन कोळी डान्स करताना का दिसतात? जे पाहून त्यांचे चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. कारण याआधी दिशा वाकानीचं असं रूप कोणीही पाहिलं नसेल.

तारक मेहता का उल्टा चष्मा या शोमध्ये दयाबेन 3 वर्षांपासून दिसली नाही पण ती इतकी लोकप्रिय आहे की, ती तिच्या पात्रासाठी नेहमी चर्चेत राहिली आहे. सध्या तिचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. पण तिची स्टाइल लोकांच्या पसंतीस उतरलेली नाही.

गरबा सोडून दयाबेनचा कोळी डान्स
व्हायरल होत असलेल्या दयाबेन म्हणजेच दिशा वाकानीच्या जुन्या व्हिडिओमध्ये ती गरबा नव्हे तर कोळी डान्स करताना दिसत आहे.  दर्या किनारे एक बंगलो या गाण्यावर ती थिरकताना दिसतेय. यावेळी घातलेली तिची खूप वेगळी असल्याचंही दिसत आहे.  ज्यामध्ये तिला ओळखणंही कठीण आहे.

व्हिडिओ पाहून चाहते हैराण
दिशा वाकानीचा हा व्हिडिओ खूप जुना आहे. जो सध्या व्हायरल झाला आहे पण चाहत्यांना तो पाहून आश्चर्य वाटले कारण ती या गाण्यात दिशा किंवा दयाबेनपेक्षा खूप वेगळी दिसत आहे. या व्हिडिओवर चाहतेही  भरभरुन कमेंट करत आहेत. गेल्या 4 वर्षांपासून, दयाबेन तारक मेहता का उल्टा चष्मापासून दूर आहे, प्रसूती रजेनंतर ती अद्याप कामावर परतली नाही. चाहते तिच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Read More