Marathi News> मनोरंजन
Advertisement

मोहित आणि स्वीटूच्या साखरपुड्याच्या दिवशी ओम देणार प्रेमाची कबुली!

ओमच्या स्वीटू बद्दलच्या प्रेमाच्या कबुलीने मालविकाचा संताप!  

मोहित आणि स्वीटूच्या साखरपुड्याच्या दिवशी ओम देणार प्रेमाची कबुली!

मुबंई : एका गोड नात्याची कथा सांगणारी 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका झी मराठीवर आली आणि अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. रसिकप्रेक्षकांनी मालिकेला आणि त्यातील नलू मावशी, दादा, चिन्या, शकू मावशी, मालविका, रॉकी ह्या पात्रांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. ‘अन्विता फलटणकर’आणि ‘शाल्व किंजवडेकर’ ह्या फ्रेश जोडीने तरुणाईवर छाप सोडलेय.

मोहित आणि आई कडून पदोपदी अपमान होऊन सुद्धा मोहित आणि स्वीटूचा साखरपुडा होतोय, किंबहुना नलू मावशीचा हा हट्टच आहे. चिन्या आणि रॉकी हा साखरपुडा होऊ नये म्हणून प्रयत्न करतायत.

अखेर तो दिवस येतो आणि साखरपुड्याच्या दिवशी मोहीतला आणि त्याच्या आईला जाणवत की स्वीटू चं लक्ष ह्या सोहोळ्यात नसून ती वेगळ्याच विचारात आहे, ओम आणि स्वीटू मध्ये काहीतरी सुरु आहे. हे कुठेतरी मोहित आणि त्याच्या आईला पचनी पडत नाहीये म्हणून त्या स्वीटू वर नको नको ते आरोप करतात. ह्या सगळ्यात ओम मध्ये पडून स्वीटू कशी निर्दोष आहे हे पटवून देतो, आणि पुन्हा एकदा आपलं स्वीटूवर प्रेम असल्याची कबुली देतो. ह्या प्रेमाच्या कबुलीनंतर मालविकाचा प्रचंड संताप होतो.

ह्या सर्व घडामोडीनंतर आता काय असेल मालविका ची पुढची खेळी? स्वीटूचा सगळ्यांसमोर झालेल्या अपमानानंतर साळवी कुटुंब विशेषतः नलू मावशी ह्या प्रेमाला होकार देतील? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर येत्या आठवड्यात पाहायला मिळणार आहेत. तेव्हा पाहायला विसरू नका “येऊ कशी तशी मी नांदायला” चा अक्शनपॅक्ड आठवडा सोमवार ते शनिवार रात्री ८ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Read More