Marathi News> मनोरंजन
Advertisement

womens day : अ‍ॅडल्ट सिनेमा ते बॉलिवूड... सनी लिओनच्या आयुष्यातील कठिण प्रसंग आणि संघर्ष

बॉलिवूडमधील (Bollywood) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक असण्यासोबतच सनी लिओन (Sunny Leone) तिच्या सोशल मीडियावरही (Social Media) खूप सक्रिय (Active)असते.

womens day : अ‍ॅडल्ट सिनेमा ते बॉलिवूड... सनी लिओनच्या आयुष्यातील कठिण प्रसंग आणि संघर्ष

Womens Day Special Sunny Leone Story : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन हे इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. सनी सध्या पॉर्न स्ट्रीम इंडस्ट्रीपासून दूर असली तरी तिने बॉलीवूडला अनेक हिट गाणी दिली आहेत. अभिनेत्रीचं फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. सनीची एक झलक पाहण्यासाठी लोक आतुर असतात.  प्रसिद्धीच्या बाबतीत आज सनी अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकते, पण या अभिनेत्रीसाठी इथपर्यंत पोहोचणं खूप कठीण होतं. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे स्ट्रगल हा असतोच. हाच स्ट्रगल सनीपासूनही सुटलेला नाही. अभिनेत्रीसाठी इथपर्यंत पोहोचणं खूप कठीण होतं. आज आम्ही तुम्हाला महिला दिनानिमीत्त सनीचा स्ट्रगल सांगणार आहोत. तिचा पॉर्न इंडस्ट्री ते फिल्म इंडस्ट्री हा प्रवास नेमका कसा सुरु झाला याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बॉलिवूडमधील (Bollywood) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक असण्यासोबतच सनी लिओन (Sunny Leone) तिच्या सोशल मीडियावरही (Social Media) खूप सक्रिय (Active) असते. तुम्हाला माहिती असेलच की सनी लिओनी बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अडल्ट फिल्म इंडस्ट्रीत (Adult Film Industry) काम करायची. त्यानंतर सनीने बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली. तिच्या थेट अभिनेत्री म्हणून येण्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवताच सनी लिओनीने पॉर्न इंडस्ट्री सोडली. आणि नंतर त्यात कधी काम केले नाही.

सनी लिओनीने गेल्या काही वर्षांपासून इंडस्ट्रीपासून दूर आहे. अभिनेत्री तिचा नवरा आणि तिन्ही मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवते. अभिनेत्री तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अनेकदा तिच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते.

 कशी आली सनी पॉर्न इंडस्ट्रीत
एक सौंदर्यस्पर्धा जिंकल्यानंतर सनीला अनेक बोल्ड फोटोशूटच्या ऑफर्स येऊ लागल्या. दरम्यान तिच्या वडीलांची नोकरी गेली आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती डगमगली. तेव्हा बोल्ड फोटोशूटबद्दल द्विधआ मनःस्थितीत ती अडकली. आणि तेव्हाच तिच्या आईला मंगळसूत्र गहाण ठेवताना सनीने पाहिले. घरची ही बिकट परिस्थिती पाहता तिने फोटोशूटचा प्रस्ताव स्विकारला आणि मिळालेल्या पैशातून तिने आईचे मंगळसूत्र सोडवलं.

परिस्थितीपुढे हतबल झाल्यानंतर तिने असे अनेक फोटोशूट केले आणि त्यातूनच तिला नवी ओळख मिळाली. पण सनी नेमकं काय काम करते, याची कल्पना तिच्या घरच्यांना नव्हती. आणि खुद्द सनीनेही त्याबद्दल गुप्तता बाळगणं पसंत केलं. अशाप्रकारे सनीने हळूहळू एडल्ट सिनेमात एंट्री घेतली.आयुष्यातील काही घडामोडींमुळे सनीनं एडल्ट इंडस्ट्रीत पाऊल टाकलं.

सनीवर आलाय बायोपिक
तिच्यावर आलेल्या बायोपिक मध्ये असं दाखवण्यात आलं आहे की, ती एक अशी मुलगी  आहे जिला तिचं करिअर निवडताना कधीच कोणताच सपोर्ट मिळत नाही, पण तिला हे करिअर स्वीकारल्याचा कोणताही पश्चाताप होत नाही.

तिला तिच्या कामातून मिळणारा पैसा खूप आवडू लागतो आणि तिला कोणी कसा आणि का जज करतं हे तिला समजत नाही.'करनजीत कौर'मध्ये सनी या वाटेवर कशी आणि का आली हे दाखवण्यात आलं आहे, तर डॉक्युमेंट्रीमधून इतरही अनेक गोष्टी आहेत. 

या सिरीजमध्ये सनीच्या आयुष्यातील तो पैलू दाखवण्यात आला आहे. जेव्हा ती एका पारंपारिक कुटुंबात राहते आणि शाळेत मॉडेलिंगसाठी तिची थट्टा केली जाते आणि तिला त्रास दिला जातो. दुसरीकडे, जेव्हा तिला पॉर्नोग्राफीतून स्टारडम मिळते तेव्हा तो पैलू देखील असतो.

खरंतर सनीची बायसेक्श्युलिटी सुद्धा कोणापासून लपून राहिलेला नाही. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाच ती केवळ पैशासाठी काम हे काम करते, हे या सिरीजमध्ये दाखवलं.  कष्टाने तिने सनी लिओनचा ब्रँड बनवला आणि हिच तिची इच्छा होती. आज तिचे बड्या अभिनेत्रींच्या यादीत येते.  मात्र अनेक वर्षापुर्वीच सनीने एडल्ट इंडस्ट्री सोडली आणि बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. सनी लिओनीने जिस्म 2 (Jism 2) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होतं.  आज सनी एक यशस्वी स्त्री आहे

Read More