Marathi News> मनोरंजन
Advertisement

रात्री उशिरा का पडले अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय घराबाहेर?

 बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची जोडी बी-टाऊनमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे

रात्री उशिरा का पडले अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय घराबाहेर?

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची जोडी बी-टाऊनमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. या कपलचे चाहते त्यांच्या नवीन फोटो आणि व्हिडिओंची आतुरतेने वाट पाहत असतात. ऐश्वर्या आणि अभिषेक दोघंही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि त्यांचे सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करतात. मात्र, आता हे दोघं अचानक रात्री उशिरा बाहेर दिसले. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्येही चिंतेची लाट उसळली होती.  

जेव्हा हे कपल घराबाहेर पडतात तेव्हा पापाराझी त्यांना स्पॉट करतात आणि यादरम्यान त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर दिसताच व्हायरल होतात. असाच प्रकार यावेळीही घडला. नुकतंच हे कपल घराबाहेर पडताना दिसलं. पण तुम्हीही जर चिंतेत असाल तर आता आम्ही तुमची ही चिंता आम्ही दूर करणार आहोत. कारण हे क्यूट कपल नाईट आऊटसाठी गेल्याचं समोर आलं आहे.  

ऐश्वर्या-अभिषेकचा नाईट आऊट
अलीकडेच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन मुलगी आराध्यासोबत मुंबईत नाईट आऊट करताना दिसले आणि त्यादरम्यान त्यांना पापाराझींनी त्यांना स्पॉट केलं. आता सोशल मीडियावर या पॉवर कपलच्या फोटोंचा बोलबाला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

स्टार फॅमिलीचा लूक
फोटोंमध्ये, ऐश्वर्या निळ्या डेनिमसह स्ट्रीप ब्लॅक ब्लेझर घातलेली दिसत आहे तर तिची मुलगी आराध्या जीन्ससोबत निळ्या टी-शर्टमध्ये गोंडस दिसत आहे. त्याचबरोबर अभिषेक प्रिंटेड हुडीमध्ये खूपच कूल दिसत होता.

Read More