Marathi News> मनोरंजन
Advertisement

मुलगा कोट्यवधींचा मालक असला तरी जॉनचे आई-वडील का करतात बसने प्रवास?

अभिनेता जॉन अब्राहन बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी आहे.

मुलगा कोट्यवधींचा मालक असला तरी जॉनचे आई-वडील का करतात बसने प्रवास?

मुंबई : अभिनेता जॉन अब्राहन बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी आहे. अनेक हीट चित्रपटांमध्ये त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तो गेल्या 12 वर्षांपासून  बॉलिवूडमध्ये काम करत आहे. सोशल मीडियावर देखील त्याच्या चाहत्यांची मोठी संख्या आहे. असंख्य लोक जॉनचे फॅन आहेत, तर दुसरीकडे जॉन त्याच्या आई-वडिलांचा फॅन आहे. जॉनचे आई-वडील प्रचंड साधे आहेत. जॉन म्हणतो, 'माझे आई-वडील चांगल्या स्वभावाचे व्यक्ती आहेत....'
 
जॉन व्यस्तवेळापत्रकातून वेळ काढत वडिलांसोबत फुटबॉल मॅच पाहातात. एवढंच नाही तर एक दिवस वडिलांसोबत युरोपमध्ये मॅच पाहाण्याच्या इच्छा देखील जॉनच्या मनात आहे. जॉनच्या आई-वडिलांबाबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलगा कोट्यवधी रूपयांचा मालक असला तरी त्याचे आई-वडील रिक्षा किंवा बसने प्रवास करतात. 

fallbacks

एका मुलाखतीत खुद्द जॉनने सांगितलं होत की त्याच्या आई-वडील आजही साधेपणाने आयुष्य जगत आहेत.  एवढंच नाही तर तो स्वतः अत्यंत साधे कपडे घालतो. जॉनचे चाहते म्हणणतात की तू शूज का नाही घालत. यावर जॉन म्हणतो, चप्पल घातल्यामुळे मला कम्फर्टेबल वाटतं. 

fallbacks

जॉनबद्दल सांगायचं झालं तर, जॉन अब्राहमची आई पारशी आणि वडील मल्याळी आहेत. म्हणूनच जॉनचीही दोन नावे आहेत. त्याचे पारशी नाव फरहान आहे. असे म्हटले जाते की आधी त्याचे नाव फरहान होते, परंतु नंतर त्याने जॉन नावाने त्याला ओळखलं जातं. 

Read More