Marathi News> मनोरंजन
Advertisement

बाबर आजमला डेट करणारी 'पाकिस्तानी अनुष्का शर्मा' कोण? लग्नही करणार?

Hania Aamir pakistan Anushka Sharma : बाबर आझमला डेट करत असलेल्या पाकिस्तानी अनुष्का शर्माला तुम्ही ओळखलतं का? कोण आहे ती आणि काय करते एकदा पाहाच...

बाबर आजमला डेट करणारी 'पाकिस्तानी अनुष्का शर्मा' कोण? लग्नही करणार?

Hania Aamir pakistan Anushka Sharma : हानिया आमिर भारतमध्ये सगळ्यात लोकप्रिय नाही. पण तिचे पाकिस्तानमध्ये खूप चाहते असून तिथल्या चित्रपटसृष्टीत ती सगळ्यात जास्त लोकप्रिय आहे. ICC वर्ल्ड कप दरम्यान, एक अफवा समोर आली होती की पाकिस्तान क्रिकेटर बाबर आझम आणि ती एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, त्या दोघांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. बाबर आणि हानिया या दोघांनी मुलाखत आणि पब्लिक प्लॅटफॉर्मवर एकमेकांना फॉलो देखील करतात आणि एकमेकांची स्तुती करताना दिसते. 

या चर्चा उगाच सुरु झालेल्या नाही, गेल्या काही दिवसात झालेल्या मुलाखतीत आणि सोशल मीडियावर बाबर आजम आणि हानिया आमिर हे एकमेकांची स्तुती करताना दिसले. खरंतर ही स्तुती फक्त अशा प्रकारे करण्यात आली होती की एक पब्लिक फिगर दुसऱ्या सेलिब्रिटीला कसे एडमायर करतात. या सगळ्यात वर्ल्ड कप दरम्यान, एका चाहत्यानं एडिट केलेला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे त्या दोघांचा एकमेकांशी संबंध असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच खरंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत आणि इतकंच नाही तर जर ते एकमेकांना डेट करत नसतील तर त्यांनी डेट करायला हवं असं म्हटलं आहे. यात हानिया आमिर, बाबर आजम एकमेकांना स्वत: पेक्षा जास्त क्यूट बोलत आहेत. तर बाबर आजमनं अभिनेत्रीसोबत चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हानिया आमिरचे चाहते फक्त बाबर आजमला डेट करण्यापर्यंतचं नाही तर तिची तुलना बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माशी होत आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्या फोटोवर त्या दोघांचे फोटो लावत हा डीपफेक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. त्यानंतर चाहते त्यांना हवी तशी त्यांची लव्ह स्टोरी असायला हवी अशी अपेक्षा करत आहेत आणि सोशल मीडियावर शेअर करत आहेत. चाहते हानिया आमिरला पाकिस्तानची अनुष्का शर्मा देखील म्हटले आहे. कारण विराट कोहली देखील टीम इंडियाचा कॅप्टन होता आणि बाबर आजम हा सध्या पाकिस्तानी क्रिकेट टीमचा कॅप्टन आहे. 

कोण आहे हानिया आमिर? 

हानियाचा जन्म 1997 मध्ये पाकिस्तानच्या रावलपिंडीमध्ये झाला होता. तिला लहाणपणापासूनच अभिनयाची आवड होती. जेव्हा ती कॉलेजमध्ये होती तेव्हा तिनं रोमॅन्टिक कॉमेडी फिल्म जानमसाठी ऑडिशन दिला होता. त्यानंतर तिनं 19 वर्षांची असताना चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. दरम्यान, तिला खरी लोकप्रियता ही तितली या सीरिजमधून मिळाली आहे. यात तिनं बेवफा असलेल्या एका महिलेची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिनं 'फिर वही मोहब्बत' आणि 'विसाल' सारख्या मालिकांमध्ये काम केलं. 

Read More