Marathi News> मनोरंजन
Advertisement

गर्लफ्रेंडच्या घरी एकांतात पकडला गेला सलमान

नेमकं तिथे काय झालं?

गर्लफ्रेंडच्या घरी एकांतात पकडला गेला सलमान

मुंबई : बॉलिवूडमधील दबंग सलमान खान हा वेगळ्याच प्रकारचा माणूस आहे. आतापर्यंत सलमान खानचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. त्यामध्ये संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ, यूलिया वंतूर यांचा समावेश आहे. सलमान खानचा लूक आणि त्याची पर्सनॅलिटी इतकी आकर्षक आहे की, त्याच्यावर कुणीही प्रेम करू शकतं. 

नुकतंच सलमान खानने त्याच्या लव लाइफशी जोडलेला एक प्रसंग सांगितला. हा प्रसंग ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. याचा उल्लेख सलमान खानने एका टीव्ही शोमध्ये काल आहे. सलमान खानने सांगितलं की, मी एकदा माझ्या गर्लफ्रेंडच्या घरी गेलो होतो तेव्हा तिथे त्याला पकडण्यात आलं. निमित्त होतं राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या सिनेमाच्या प्रमोशनचं. 

सलमान खानने शेअर केल्यानुसार, त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरी कुणी नव्हतं तेव्हा तो गेला होता. तेव्हा अचानक त्या गर्लफ्रेंडच्या घरातील मंडळी आली. गोंधळलेल्या सलमानने लपण्यासाठी जागा पाहित असताना त्याला कपाटात लपण्याची आयडिया आली. तेव्हा गर्लफ्रेंडच्या घरातल्यांपासून लपण्यासाठी कपाटात गेला. पण अचानक शिंक आल्यामुळे तो पकडला गेला. मात्र नंतर यावरून काही झालं नाही. यावर सलमान खानचे वडील सलीम खान म्हणायचे की, जर तुला तुझ्या गर्लफ्रेंडसोबत वेळ घालवायचा असेल तर तू तिला घरी घेऊन ये. बाहेर जाण्यापेक्षा तुम्ही घरी एकत्र वेळ घालवा. 

Read More