Marathi News> मनोरंजन
Advertisement

''मी त्यांच्या प्रेमात'' रेखा यांनी व्यक्त केल्या अमिताभ यांच्याबद्दलच्या भावना

रेखाजी आजही त्यांच्या नृत्यासाठी फेमस आहेत तर बीग बींनी वयाची ऐंशी ओलांडली तरी आजही ते तितकेच लोकप्रिय आणि सर्वांचे आवडते अभिनेते आहेत.

''मी त्यांच्या प्रेमात'' रेखा यांनी व्यक्त केल्या अमिताभ यांच्याबद्दलच्या भावना

मुंबईः बीग बी अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या अफेरच्या चर्चा आजही केल्या जातात. रेखाजी आजही त्यांच्या नृत्यासाठी फेमस आहेत तर बीग बींनी वयाची ऐंशी ओलांडली तरी आजही ते तितकेच लोकप्रिय आणि सर्वांचे आवडते अभिनेते आहेत. बीग बी यांनी बिग बॉसपासून ते केबीसी अशा हरएक तऱ्हेच्या रिएलिटी शोतून कामही केलं आहे. 

गेली अनेक वर्षे अमिताभ बच्चन सर आणि रेखाजी यांच्या कलेवर प्रेम करणारे त्यांचे लाखो चाहते त्यांच्या मैत्रीवर आपल्या भावना व्यक्त करताना दिसतात. तेव्हा 'कॉफी विथ करन' असा ग्लॅमरस आणि कॉन्ट्रोव्हर्शल शो नव्हता पण तेव्हा अनेक मुलाखतींतून अभिताभ बच्चन यांच्याशी संवादकांनी बातचीत केली आहे. 

नव्वदच्या दशकात गप्पा, मुलाखती आणि कॉफी यांची सांगड असायची ती सिमी गरेवाल यांच्या 'रॅन्डेव्हस' या शोमध्ये. तेव्हा त्या शोमध्ये येऊन अनेक कलाकरांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक कबूलीजबाबही दिले आहेत. 

याच शोच्या एका भागात प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांनीही हजेरी लावली होती. त्या शोच्या एका एपिसोडमधून संवादिका सिमी गरेवाल रेखा यांच्याशी संवाद साधतात. त्यावेळी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तरं देताना रेखा यांनी आपले मनं मोकळे केले होते. तेव्हा गप्पांच्या ओघात त्यांचा विषय अमिताभ बच्चन, रेखा आणि जया बच्चन यांच्याभोवती आला होता.  

रेखा यांनी त्यावेळी बोलताना अमिताभ यांच्यावरील भावना व्यक्त केल्या होत्या. अख्ख्या जगाप्रमाणेच मीही त्यांच्या प्रेमात होते. पण आमचे वैयक्तिक संबंध कधीच नव्हते अशी कबूली रेखा यांनी दिली होती. 

सर्वत्र अमिताभ बच्चन, रेखाजी आणि जया बच्चन यांच्याबद्दल भरपूर प्रमाणात गॉसिप सुरू असूनही जया बच्चन यांच्यासोबत मतभेद असल्याचेही रेखा यांनी फेटाळून लावले. जयाजींना रेखा या दीदी हाक मारतात. 

Read More