Marathi News> मनोरंजन
Advertisement

जितेंद्र यांना हसवण्यासाठी महमूद यांनी आपल्या कपड्यांचा असा वापर केला

जितेंद्र यांनी कपिलशी बोलताना शूटिंगच्या दिवसांमधील मजेदार किस्से सांगितले.

जितेंद्र यांना हसवण्यासाठी महमूद यांनी आपल्या कपड्यांचा असा वापर केला

मुंबई : कपिल शर्मा हा कार्यक्रम कदाचित या क्षणी ऑफ एअर झाला असेल, पण या शोमध्ये फिल्मी स्टार्सनी येऊन असे आश्चर्यकारक किस्से सांगितले आहेत. जे ऐकल्यानंतर कोणालाही हसू आवरणार नाही. अशीच एक कहाणी बॉलिवूड अभिनेते जितेंद्र यांनी सांगितली होती

जितेंद्र यांनी कपिलशी बोलताना शूटिंगच्या दिवसांमधील मजेदार किस्से सांगितले आणि सर्वांनाच हसवून सोडलं. त्यांनी महमूद यांचा किस्साही सांगितला. त्यांना हसवण्यासाठी महमुद यांनी आपली पँट कशी काढली हे देखील सांगितलं.

शोमध्ये प्रश्नोत्तरांच्या दरम्यान कपिल शर्माने जितेंद्र यांना प्रश्न विचारला की, असा कोणता अभिनेता होता जो खऱ्या आयुष्याही  खुप विनोदी होता ज्याच्यामुळे, शॉट देणं देखील कठीण व्हायचं?" कपिलला उत्तर देत जितेंद्र म्हणाले, 'माझा अनुभव आहे कि, भाईजान महमूद सर.. ते कॉमेडी तर होतेचं मात्र ते जिनीयस पण होते.

एका शॉटमध्ये अरुणा ईरानी आणि मी समोरासमोर उभे होतो. अरुणा यांच्या मागे एक दरवाजा होता. मला त्या दरवाज्याकडे बघून हसायचं होतं. पण मला हसू येत नव्हतं. डायलॉग बोलता-बोलता मी खूप प्रयत्न केला. पण मला हसू येतच नव्हतं'.

fallbacks

जितेंद्र पुढे म्हणाले, 'मी विचार करत होतो की, आता मी काय करु? मग भाईजान महमूद आले आणि म्हणाले, 'जेव्हा शॉट येईल तेव्हा तु दरवाज्याकडे बघत माझ्याकडे बघ. मी म्हणालो ठीक आहे. मग जेव्हा मी डायलॉग बोलताना हसण्यासाठी अरुणा इराणीकडे बघून मागे असलेल्या दरवाजाकडे पाहिलं तेव्हा भाईजान पँट्स खाली करुन उभे होते. मग मी येवढा हसलो की, माझं हसणंच थांबत नव्हतं.

Read More