Marathi News> मनोरंजन
Advertisement

अक्षय कुमार आणि रोहित शेट्टीमध्ये वाद! एकमेकांना सगळ्यांसमोर मारहाण

अक्षय कुमार आणि कतरिना कैफ स्टारर चित्रपट 'सूर्यवंशी' रिलीज होतोच या सिनेमाने धुमाकूळ घातला होता. 

अक्षय कुमार आणि रोहित शेट्टीमध्ये वाद! एकमेकांना सगळ्यांसमोर मारहाण

मुंबई : अक्षय कुमार आणि कतरिना कैफ स्टारर चित्रपट 'सूर्यवंशी' रिलीज होतोच या सिनेमाने धुमाकूळ घातला होता. दिग्दर्शक रोहित शेट्टीचा चित्रपट कोरोनामुळे अनेकदा पुढे ढकलण्यात आला होता. पण गेल्यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने रसिकांच्या मनाचा उदासीनता संपवली होती. पण तुम्हाला माहित आहे का की, या चित्रपटाच्या सेटवर अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी यांचं मोठं भांडण झालं होतं. 

अक्षय आणि रोहितचं सेटवर भांडण
या व्हिडिओमध्ये सुरुवातीला कतरिना कैफची झलक दिसत आहे, ती मोबाईलमध्ये अक्षय कुमार आणि रोहितमधील भांडणाची बातमी वाचत आहे. त्याचबरोबर दोघांमध्ये भांडण सुरू होतं. दोघांमध्ये बाचाबाची होते. दोघांनी आधी एकमेकांची कॉलर धरली आणि मग एकमेकांना मारायला सुरुवात केली. संपूर्ण टीम दोघांना पकडून वेगळं करतात.  

हा व्हिडिओ शूटिंगदरम्यानचा आहे
हा व्हिडिओ 2019 मध्ये सोशल मीडियावर आला होता. 'सूर्यवंशी'ची रिलीज डेट जसजशी जवळ येत होती, तसतसा हा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत होता. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या भांडणानंतर रोहित आणि अक्षयने देखील हा सगळा गंमतीचा भाग असल्याचं सांगितलं होतं आणि करण जोहर देखील सोशल मीडियावर दोघांमध्ये मजेदार पद्धतीने समेट करण्यासाठी दिसला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 या सिनेमाच्या रिलीजची तारीख अनेकवेळा पुढे ढकलली
अक्षय कुमार, अजय देवगण, कतरिना कैफ आणि रणवीर सिंग यांचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट मार्च 2020 मध्ये रिलीज होणार होता. पण कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलावी लागली होती. नंतर अशा बातम्या आल्या होत्या की, निर्माते हा सिनेमा OTT वर रिलीज करू शकतात. यानंतर हा चित्रपट ६ नोव्हेंबर २०२१ ला प्रदर्शित झाला.

Read More