Marathi News> मनोरंजन
Advertisement

तब्बू का लपवते आडनाव, अभिनेत्रीचा मोठा खुलासा

तब्बू ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 

तब्बू का लपवते आडनाव, अभिनेत्रीचा मोठा खुलासा

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तब्बू (Tabu) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तब्बूचे लाखो चाहते आहेत. तब्बूनं आजवर अनेक भूमिका साकारल्या आहेत. तब्बूनं 4 नोव्हेंबर रोजी तिचा वाढदिवस साजरा केला. (Tabu Birthday) तब्बू ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. मात्र, तरी देखील तब्बूच्या खासगी आयुष्याविषयी कोणाला जास्त माहित नाही आहे. दरम्यान, तब्बूचं आडनाव काय आहे हे अनेकांना माहित नाही. (Tabu's Surname) 

पाहा काय म्हणाली तब्बू

तब्बूचं आडनाव कोणाला माहित नाही. सगळ्यात महत्त्वाच कारण म्हणजे तब्बूनं तिचं आडनाव लपवण्याचं कारण एका मुलाखतीत सांगितलं होतं. तब्बू म्हणाली की तिला तिच्या वडिलांचं आडनाव वापरावं असं तिला वाटलं नाही. तब्बू आधी फातिमा हे नाव लावायची तर हेच तिचं मधलं नाव आणि आडनाव होतं. याविषयी बोलताना तब्बू म्हणाली, 'ती आधापासून तिच्या नावापुढे हाश्मी लावत नाही. वडीलांचं आडनाव लावणं गरजेच आहे असं मला कधीच वाटलं नाही. शाळेत असताना मी माझ्या नावापुढे फातिमा लावायचे, जे माझं मधलं नावं होतं. माझ्याकडे वडिलांच्या कोणत्याही आठवणी नाहीत. याशिवाय त्यांना भेटण्याची माझी कधी इच्छाही झाली नाही पण माझी बहिण त्यांना बऱ्याचवेळा भेटली आहे.' (What Is Tabu s Surname and Why She Hide It Actress Explains) 

हेही वाचा : वरुण धवनला झालेला Vestibular Hypofunction आजार तुम्हाला होऊ शकतो का? घ्या जाणून!

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याविषयी बोलताना तब्बू म्हणाली, 'त्यांच्या विषयी जाणून घेण्यास मी कधी उत्सुक नव्हते. माझं ज्या प्रकारे संगोपन झालं आहे त्यावर मी आनंदी आहे. माझ्या या आयुष्यात मी पूर्णपणे सेटल झाले आहे. तिच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर तब्बू सगळ्यात शेवटी कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 2' या चित्रपटात दिसली होती. लवकरच तब्बू 'कुत्ते', 'खुफिया', 'दृश्यम 2' आणि 'भोला' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. 

Read More