Marathi News> मनोरंजन
Advertisement

कोरोना : क्वारंटाईन काळात काय करते अश्विनी भावे?

कोरोनाचा जगभरात थैमान

कोरोना : क्वारंटाईन काळात काय करते अश्विनी भावे?

मुंबई : कोरोनाने संपूर्ण जगाला वेढीस धरलं आहे. या कोरोना व्हायरसमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात खूप उलथापालथ झाली आहे. अनेक ठिकाणी तर कर्फ्यू लावण्यात आला आहे. कॅलिफोर्नियामध्ये देखील 'शेल्टर इन प्लेस' अशी ताकीद देण्यात आली आहे. अशावेळी अभिनेत्री अश्विनी भावे या क्वारंटाईन काळात नेमकं काय करत आहे? 

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिलंच आहे की, अश्विनी भावे स्वतःच्या घरी कायम नवनवीन गोष्टी करण्यात बिझी असतात. पण आता आयत्या हातात आलेल्या वेळेचं नेमकं काय करायचं? हा प्रश्न त्यांना देखील पडला आहे. 

अशावेळी अश्विनी भावे त्यांच्या आवडीचं काम करतात. एक तर वाचन, दुसरं स्वयंपाक बनवणं आणि महत्वाचं म्हणजे बागकाम करणं. आपण या अगोदरही अश्विनी भावे यांना त्यांच्या बागेत बाग काम करताना पाहिलं आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे. 

कोरोना व्हायरसमुळे कलाविश्वाला मोठा फटका बसला आहे. कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव पाहता राज्यातील सर्व सिनेमागृह देखील काही काळासाठी बंद करण्यात आले आहेत. दरम्यान चित्रपटांचे शूटींग देखील थांबवण्यात आले आहे. त्यामुळे सेलेब्रिटी आता घरीच बसले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकारांनी त्यांच्याविषयी माहिती चाहत्यांना दिली आहे.

Read More