Marathi News> मनोरंजन
Advertisement

व्हिडिओ: लग्नाच्या दिवशी बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरीने केला बेले डान्स

समाज माध्यमांवर (सोशल मीडिया) सध्या एक व्हिडिओ भलताच व्हायरल होत आहे. ज्यात एक नवरी लग्नाचे कपडे आणि जिन्स पॅन्ट असा हटके पोषाख करून डान्स करताना दिसत आहे.

व्हिडिओ: लग्नाच्या दिवशी बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरीने केला बेले डान्स

मुंबई : समाज माध्यमांवर (सोशल मीडिया) सध्या एक व्हिडिओ भलताच व्हायरल होत आहे. ज्यात एक नवरी लग्नाचे कपडे आणि जिन्स पॅन्ट असा हटके पोषाख करून डान्स करताना दिसत आहे.

सहा लाख लोकानी पाहिला व्हिडिओ

आतापर्यंत समाजमाध्यमांवर असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. पण, हा काहीसा हटके आहे. केवळ एकाच दिवसात सहा लाखांहूनही अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओत डान्स करणाऱ्या मुलीच्या हातावर मेहंदी रेखाटलेली दिसते. तर, हातात चुडाही दिसतो. तिने लग्नात वापरले जाणारे कपडे वापरले आहेत. तर, जिन्स पॅन्ट आणि त्यावर स्पोर्ट शूजही घातले आहेत.

वेंडिंग फोटोग्राफरने व्हिडिओ केला शेअर

दिल्लीस्थित एक वेंडिंग फोटोग्राफर प्रियंका कम्बोज चोपडा यांनी आपल्या डिजाईन एक्वा स्टूडियो नावाच्या अकाऊंटवरून इस्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, कूल, वधूला टॅग करा. आपण अनेक वधूंचा डान्स पाहिला असेल. पण, असा डान्स मुळीच पाहिला नसेल. या वधून १६ वर्षांपर्यंत क्लासिकल डान्स शिकला आहे. पहा राशिकाला आपल्या लग्नादिवशी डान्स करताना. 

Read More