Marathi News> मनोरंजन
Advertisement

हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध विनोदी अभिनेत्याचं निधन

चाहत्यांसाठी मोठा धक्का 

हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध विनोदी अभिनेत्याचं निधन

मुंबई : लोकप्रिय तामिळ अभिनेता विवेक यांचं चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात शनिवारी सकाळी निधन झालं. रूग्णालयातून मेडिकल बुलेटिन घेऊन ही धक्कादायक माहिती देण्यात आली. पहाटे 4.35 च्या सुमारास अभिनेता विवेक यांची प्राणज्योत मालवली. (Vivek, Tamil film actor, dies in Chennai hospital)  शुक्रवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हा त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

मिळालेल्या माहितीनुसार, विवेक यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. छातीत दुखत असल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं होतं. वयाच्या 59 व्या वर्षी कॉमेडी अभिनेत्याने गुरूवारी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली होती. (अभिनेता विवेक यांना हृदयविकाराचा झटका, रूग्णालयात दाखल) 

शुक्रवारी त्यांनी छातीत दुखू लागलं आणि चक्कर येऊन ते कोसळले. तेव्हा त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल केलं होतं. गुरूवारी 59 वर्षांचे अभिनेता विवेक यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली होती. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांनी कोरोनापासून रक्षण करण्यासाठी स्वतःची काळजी घेण्यास सांगितलं. याकरता मास्क घालणे, सतत हात धुवत राहते आणि योग्य ते अंतर राखणे या गोष्टी महत्वाचं असल्याचं देखील सांगितलं. स्वतःला कोरोनापासून वाचायचं असेल तर लस घेणं गरजेचं असल्याचं देखील ते यावेळी म्हणाले. 

 

गीतकार ए आर रहमान यांनी ट्विट करून विवेक यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. विवेक यांचं निधन साऱ्यांनाच धक्का देणारी घटना आहे. 

विवेक हे सोशल मीडियावरील ट्विटर प्लॅटफॉर्मवर कायम ऍक्टिव होते. त्यांनी लस घेतल्यावर डॉक्टरांचे आभार देखील मानले होते. 

Read More