Marathi News> मनोरंजन
Advertisement

Video: लग्नपत्रिकेसंदर्भात परिणितीचं नाव घेत प्रश्न विचारताच राघव चढ्ढा लाजून म्हणाले, 'तुम्हाला...'

Viral Video Parineeti Chopra Raghav Chadha Wedding: परिणिती आणि राघव यांची लग्नपत्रिका व्हायरल झाल्यानंतर आपचे खासदार असलेले राघव पहिल्यांचा प्रसारमाध्यमांसमोर आले होते.

Video: लग्नपत्रिकेसंदर्भात परिणितीचं नाव घेत प्रश्न विचारताच राघव चढ्ढा लाजून म्हणाले, 'तुम्हाला...'

Viral Video Parineeti Chopra Raghav Chadha Wedding: अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे राज्यसभेचे खासदार राघव चढ्ढा यांच्या लग्नीची सध्या मनोरंजन सृष्टीमध्ये चर्चा आहे. या दोघांचा साखरपुडा 13 मे रोजी पार पडला. या दोघांच्या लग्नाची पत्रिका आणि तारीख समोर आली आहे. 24 सप्टेंबर रोजी या दोघांचं लग्न जयपूरमध्ये पार पडणार आहे. लग्नपत्रिकेची सोशल मीडियावर चर्चा असतानाच नवी दिल्लीमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये राघव चढ्ढा यांना लग्नाबद्दल विचारण्यात आलं असता ते लाजल्याचं दिसून आलं. 

लग्नाची पत्रिका आली समोर

काही दिवसांपूर्वीच राघव चढ्ढा आणि परिणिती चोप्रा यांच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका व्हायरल झाली होती. या पत्रिकेनुसार लग्न 23 आणि 24 सप्टेंबर रोजी उदयपूरमधील लिला पॅलेसमध्ये लग्नसोहळा पार पडणार आहे. लग्न ताज तलावाजवळ पार पडणार आहे. 23 तारखेला सकाळी 10 वाजल्यापासून कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. पाहुण्यांचं आगमन, जेवण असा दुपारचा कार्यक्रम असून संध्याकाळी पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. 90 च्या दशकातील मुलांप्रमाणे आनंद साजरा करुयात अशी या पार्टीची थीम असणार आहे. 

परिणितीचं नाव घेऊन प्रश्न विचारला असता

लग्न सोहळा 24 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. दुपारी 1 वाजता लग्नाच्या विधी सुरु होती. दुपारी 2 वाजता मिरवणूक असेल. लग्नाचे सर्व विधी लिला पॅलेसमध्ये पार पडतील. 6.30 ला नवरी मुलगी माहेरच्यांचा निरोप घेईल असं आमंत्रण पत्रिकेत म्हटलं आहे. त्यानंतर साडेआठ वाजता रिसेप्शन आयोजित केलं जाणार आहे. हे दोघेही 30 सप्टेंबर रोजी चंडीगढमध्ये विशेष रिसेप्शनचंही आयोजन करणार आहेत. ही पत्रिका व्हायरल झाल्यासंदर्भातील प्रश्न राघव चढ्ढा यांना पत्राकारांनी विचारला. मुंबईमधून येत असलेल्या बातम्या, लग्नाची तारीख, परिणितीचा उल्लेख करत अनेक प्रश्न अनेक पत्रकारांनी एकाच वेळेस विचारण्यात सुरुवात केल्यानंतर राघव चढ्ढा पत्रकारांकडे पाहून हसू लागले. अगदी मनमोकळेपणे हसत समोरचे माईक थोडे खाली करुन हातवारे करताना, "तुम्हाला लवकरच लग्नासंदर्भात कळवतो," असं राघव चढ्ढा लग्नासंदर्भातील प्रश्नावर म्हणाले.

मुंबई आलेले तेव्हा फिल्म सिटीत जाऊन घेतलेली भेट

काही दिवसांपूर्वीच 'इंडिया' आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत आलेल्या राघव चढ्ढांनी आपल्या होणाऱ्या पत्नीची थेट फिल्म सिटीमधील जाहिरातीच्या सेटवर जाऊन भेट घेतली होती. परिणीती सध्या अभिनेता अक्षय कुमारबरोबर 'मिशन राणीगंज' चित्रपटाचं शुटींग करत आहे. तसेच दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या 'चमकीला' चित्रपटामध्येही परिणीती दिलजीत दोसांजबरोबर दिसणार आहे.

Read More