Marathi News> मनोरंजन
Advertisement

'हम साथ साथ है'; लेकीसाठी Ex-Wife, मुलासोबत आमिरचा खास परफॉर्मन्स, कधी पाहिलंय त्याचं हे रुप?

Ira Khan Wedding Video : अभिनेता आमिर खान याची मुलगी आयरा खान आणि सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला.   

'हम साथ साथ है'; लेकीसाठी Ex-Wife, मुलासोबत आमिरचा खास परफॉर्मन्स, कधी पाहिलंय त्याचं हे रुप?

Ira Khan Wedding Video : नोंदणी पद्धतीनं लग्न करण्याचा निर्णय घेत आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी त्यांच्या नात्याला एक वेगळं नाव दिलं. अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर नुपूर आणि आयरानं लग्नाचा निर्णय घेतला आणि त्यांच्या या निर्णयाचं कुटुंबीय, मित्रपरिवारानं स्वागत केलं. 

आयरा आणि नुपूर यांनी मुंबईतच Register Marriage केलं आणि त्यानंतर एक छानशी पार्टीसुद्धा दिली. ज्यानंतर आता ही जोडी त्यांचे कुटुंबीय आणि खास मित्रपरिवारासोबत उदयपूरला पोहोचली असून, तिथं मेहंदी, संगीत आणि मग विवाहसोहळा अशा साग्रसंगीत पद्धतीनं त्यांच्या विवाहसोहळ्यातील कार्यक्रम पार पडण्यास सुरुवात झाली आहे. 

ताज अरावली, उदयपूर (Udaipur) येथे नुपूर आणि आयरा मराठमोळ्या पद्धतीनं लग्नगाठ बांधणार आहेत. तत्पूर्वी या विवाहसोहळ्याच्या निमित्तानं अनेक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं. संगीत सोहळा हा त्यापैकीच एक. याच संगीत सोहळ्यामध्ये आमिर खाननं त्याच्या लेकिसाठी म्हणजे आयरासाठी एक खास गाणं गायलं. यावेळी आमिरला साथ मिळाली ती म्हणजे त्याची एक्स वाईफ, किरण राव आणि मुलगा आझाद यांची. 

किरण, आझाद आणि आमिर या तिघांनी मिळून आयरासाठी 'फुलों का तारों का सबका कहना हैं...' हे गाणं सादर केलं. यावेळी 'एक हजारोंमे मेरी बहना हैं' असं म्हणणाऱ्या आझादला पाहून अनेकांनाच त्याचं कौतुक वाटलं. इतक्या पाहुण्यांसमोर आझादचा आत्मविश्वासाचंही अनेकांनीच कौतुक केलं. 

हेसुद्धा वाचा : Vande Bharat Express चे वांदे! ताशी 100 किमी वेगानं धावणारी ट्रेन अचानकच का थांबली?

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

बरं, आयराच्या लग्नाच्या निमित्तानं आमिर आणि त्याच्या दोन्ही एक्स वाईफ यांच्यासोबतचं त्यांचं मैत्रीपूर्ण नातंही फार सुरेखपणे सर्वांसमोर आलं आहे. ज्यामुळं खान कुटुंबासाठी हे क्षण 'हम साथ साथ हैं' सारखे किंबहुना त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहेत असं म्हणालयला हरकत नाही. 

किस्सा आयरा आणि नुपूरच्या भेटीगाठींचा... 

असं म्हटलं जातंय की, आयरा आणि नुपूर या दोघांची भेट लॉकडाऊन काळात झाली होती. त्यावेळी नुपूर आमिर खानचा फिटनेस ट्रेनर होता आणि आयरा तिच्या वडिलांसोबत म्हणजेच आमिरसोबतच राहत होती. पुढे त्यांची मैत्री झाली आणि या मैत्रिला प्रेमाचं वळणही मिळालं. नात्याच्या अशा या प्रवासात आता ही जोडी एका नव्या टप्प्यावर पोहोचली आहे. 

Read More