Marathi News> मनोरंजन
Advertisement

'सर्किटने' केलं रुग्णालयातील नर्सशी लग्न, बऱ्याच वर्षांनंतर फोटो पाहून लोकं हैराण

तुम्ही एका गोष्टीवर नक्कीच लक्ष दिले नसणार ते म्हणजे कॅरेक्टर.

'सर्किटने' केलं रुग्णालयातील नर्सशी लग्न, बऱ्याच वर्षांनंतर फोटो पाहून लोकं हैराण

मुंबई : 'मुन्ना भाई एमबीबीएस' हा चित्रपट लोकांच्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. लोकांना या चित्रपटातील डायलॉग आणि यामधील कॅरेक्टर खूप जवळचे आहे. त्यात लोकांना चित्रपटातील मुन्ना (संजय दत्त) आणि सर्किट (अरशद वारसी) यांची जोडी खूप आवडली. लोकांनी हा चित्रपट इतक्यांदा पाहिला की, यामधील प्रत्येक गोष्ट लोकांच्या आठवणात आहे. परंतु तुम्ही एका गोष्टीवर नक्कीच लक्ष दिले नसणार ते म्हणजे चित्रपटातील कॅरेक्टर सर्किट म्हणजेच अरशद वारसी आणि त्याच्या लग्नं.

चित्रपटाच्या शेवट हा मुन्ना (संजय दत्त) आणि सर्किट या दोघांच्या लग्नाने झाला आहे.  एकिकडे मुन्नाने आपल्या आवडत्या मुलीशी म्हणजे डॉ रुस्तमच्या मुलीसोबत लग्न केले आहे. तर सर्किटचेही लग्न झाले आहे. परंतु त्याने लग्न केलेली ही मुलगी कोण? तुम्ही तिला ओळखलं का?

सर्किटने लग्न केलेली ती मुलगी चित्रपटात दाखवलेल्या मेडिकल कॉलेजची नर्स आहे. आपले आत्तापर्यंत या गोष्टीकडे लक्षचं गेले नसणार, परंतु आता या दोघांचा चित्रपटातील तो जूना फोटो व्हायरल होताच, इतक्या वर्षानंतर लोकांचे याकडे लक्ष गेलं आहे.

 बऱ्याच वर्षानंतर हे फोटो पाहून या चित्रपटाचे चाहाते आश्चर्यचकित झाले आहेत आणि आता हा फोटो सोशल मीडियावर वेगाने शेअर होत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आयकॉनिक मुन्ना-सर्किट जोडी

या चित्रपटात संजय दत्त गुंड दाखवला आहे, जो आपल्या वडिलांना खुश करण्यासाठी एमबीबीएमची डिग्री घेऊ इच्छित आहे. सर्किट हा या चित्रपटात मुन्नाचा पार्टनर आहे, जो प्रत्येक कामात मुन्नाबरोबर चित्रपटात दिसला आहे. सर्किटची भूमिका अर्शद वारसीने साकारली आहे.

Read More