Marathi News> मनोरंजन
Advertisement

जबरदस्त Belly Dance |Prithvi Shaw ची Rumored Girlfriend Prachi Singh ची धमाल

प्राचीने आमिर खान (Aamir Khan) आणि  एली अवराम (Elli AvrRam) च्या सुपर हिट गाण्यावर डान्स केला आहे. 

जबरदस्त Belly Dance |Prithvi Shaw ची Rumored Girlfriend Prachi Singh ची धमाल

मुंबई : टीम इंडिया आणि दिल्ली कॅपिटल्सचा उभरता खेळाडू पृथ्वी शॉची रूमर्ड गर्लफ्रेंड (Rumored Girlfriend) प्राची सिंह (Prachi Singh)सध्या सोशल मीडियावरील चर्चेचा विषय बनली आहे. आधीच प्राची सिंग ही पृथ्वी शॉची गर्लफ्रेंड म्हणून सोशल मीडियावर चर्चेत आली. त्यानंतर सोशल मीडियावर प्राचीची पॉप्यूल्यॅरिटी आणखी वाढली. त्यानंतर आता प्राचीने तिच्या डान्सने लोकांना चर्चेला विषय दिला आहे.

प्राचीने आमिर खान (Aamir Khan) आणि  एली अवराम (Elli AvrRam) च्या सुपर हिट गाण्यावर डान्स केला आहे. 'हरफन मौला' (Har Funn Maula)या गाण्यावर प्राचीने बेली डान्स करत ठुमके मारले आहेत. जे चाहात्यांचे लक्ष वेधून घेत आहे.  ज्यानंतर तिच्या या व्हीडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा चाहात्यांकडून वर्षाव करण्यात आला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्राचीने या आधी, दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh)यांच्या 'गोलियों की रासलीला राम-लीला' (Goliyon Ki Rasleela Ram-Leela)या चित्रपटामधील 'अंग लगा दे' (Ang Laga De) या गाण्यावर मनमोहक डान्स केला. त्याला ही प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पृथ्वी शॉ आणि टीव्ही अभिनेत्री प्राची सिंह (Prachi Singh)या दोघ्यांच्या प्रेमाच्या चर्चा होत आहेत. परंतु या दोघांनीही त्यांच्या प्रेमाला अद्याप लोकांसमोर जाहीर केले नाही.

Read More