Marathi News> मनोरंजन
Advertisement

अखेर भांडं फुटलंच! 'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला Kiss करताना Tamannaah Bhatia कॅमेऱ्यात झाली कैद

Tamannaah Bhatia याचा या लोकप्रिय अभिनेत्याला Kiss करतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपचं वृत्त खरं असल्याचे म्हटले जात आहे. 

अखेर भांडं फुटलंच! 'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला Kiss करताना Tamannaah Bhatia कॅमेऱ्यात झाली कैद

Vijay Varma and Tamannaah Bhatia Dating? : एकीकडे 2023 हे वर्ष नुकतच सुरु झालं आहे. तर दुसरीकडे एकामागे एक धक्कादायक खुलासे होत आहेत. सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे डार्लिंग्स (Darlings) स्टार विजय शर्मा (Vijay Sharma) आणि 'बाहुबली' (Bahubaali) फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) यांचा एक रोमॅंटिक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यांचा हा व्हिडीओ 2023 चे स्वागत करतानाचा आहे. त्यांचा एका पार्टीतील किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

तमन्ना भाटीया आणि विजय शर्मा हे दोघं गोव्यात क्वालीटी टाईम घालवण्यासाठी गेले होते. मात्र, तेथेही त्यांच्या चाहत्यांनी त्यांचा पाठलाग सोडला नाही. तमन्ना आणि विजय नवीन वर्षाचे स्वागत करताना एकमेकांसोबत डान्स करताना दिसले. यावेळी फक्त चर्चा सुरु नाही तर त्यांच्या चाहत्यांनी त्या दोघांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. तमन्ना आणि विजय यांच्या डेटिंगच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. हे पहिल्यांदा नाही जेव्हा हे दोघे एकत्र दिसले. याआधी देखील या दोघांना दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये एकत्र पाहिले होते. (Vijay Varma and Tamannaah Bhatia Dating Rumours Starts After Kissing Video Viral) 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तमन्नानं यावेळी गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर विजयनं पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. दरम्यान, गोव्यातील व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तमन्ना आणि विजय किस करताना दिसत आहेत. तमन्नाला विजयसोबत पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. तर काही नेटकऱ्यांनी त्यांच्यातील केमिस्ट्री पाहून नेटकऱ्यांना आनंद झाला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'हे कधी झालं.' तर दुसरा नेटकरी म्हणाला, 'ही लस्ट स्टोरी नाही लव्ह स्टोरी आहे.' तमन्ना आणि विजयसोबत या पार्टीतून अनेक चाहत्यांनी फोटो शेअर केले आहेत. (Vijay Varma and Tamannaah Bhatia New Year Celebration Video)

हेही वाचा : 'शंकराच्या मंदिरात आणि काली मातेला दारूचा नैवद्य चालतो...', Ketaki Chitale ची वादग्रस्त कमेंट

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तमन्ना आणि विजय हे पहिल्यांदाच एकत्र दिसले नाही. तर या आधी देखील बऱ्याचवेळा ते एअरपोर्टवर एकत्र दिसले आहेत. त्या दोघांनी कधीच मीडियासमोर त्यांच्या रिलेशनशिपवर दुजोरा दिलेला नाही. पण आता त्यांना किस करताना व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना त्यांच्या रिलेशनशिपविषयी कळले आहे. दरम्यान, हे दोघे लवकरच 'लस्ट स्टोरीज 2' (Lust Stories 2) मध्ये दिसणार आहेत. 

Read More