Marathi News> मनोरंजन
Advertisement

'चांदनी'ची व्यक्तिरेखा साकारण्यास विद्या इच्छूक

 स्टारी नाईट्स 2 च्या भागात तिने एक इच्छा व्यक्त केली.

'चांदनी'ची व्यक्तिरेखा साकारण्यास विद्या इच्छूक

मुंबई : 'द डर्टी पिक्चर' फेम अभिनेत्री विद्या बालनने बॉलिवूडमध्ये  आपल्या अभिनयाच्या जोरावर एक स्थान कायम केले. अनेक सिनेमांमध्ये तिने आपली दमदार भूमिका बजावली आहे. स्टारी नाईट्स 2 च्या भागात तिने एक इच्छा व्यक्त केली. हरहुन्नरी अभिनेत्री श्रीदेवींच्या बायोपिक मध्ये काम करण्याची इच्छा तिने व्यक्त केली. बॉलिवूड मधील 'चांदनी'ला श्रद्धांजली म्हणून तिला श्रीदेंवीच्या बायोपिक मध्ये काम करण्याची इच्छा आहे.

'स्टारी नाईट्स 2' रविवारी झी कॅफे वाहिनी वर प्रकाशीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात विद्याला तिच्या बोल्ड भूमिकांच्या निवडी बद्दल प्रश्न विचारण्यात आले. नेहमीच आपले परखड मत मांडणाऱ्या विद्याने सांगितले, 'माझ्या आयुष्यात मला नेहमीच सर्वात महत्वाचे व्यक्तीमत्व वाटते. जेव्हा मला इश्किया सिनेमाबद्दल विचारणा करण्यात आली. तेव्हा मी सिनेमाची कथा वाचली आणि मला ती आवडली.'

जेव्हा कार्यक्रमाची सूत्रसंचालक कोमल नहताने विद्याला अभिनेत्री श्रीदेवींच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल का? याबाबत विचारणा करण्यात आल्या नंतर विद्याने लगेचच होकार भरला, 'श्रीदेवींच्या भूमिका पार पाडण्यासाठी खूप हिमतीची गरज आहे अणि श्रीदेवींसाठी श्रद्धांजली असेल.' शेवटी तिने बॉलिवूडच्या 'चांदनी'ची भूमिका साकाराला आवडेल असे सांगितले. 

Read More