Marathi News> मनोरंजन
Advertisement

विद्या बालन आहे एका मुलीची आई, जगापासून लपवले होतं सत्य?, अखेर अभिनेत्रीनेच सांगितलं खरं काय ते

Vidya Balan Daughter: अभिनेत्री विद्या बालनचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. एका लहान मुलीसोबत ती दिसत आहे त्यामुळं ती तिचीच मुलगी असल्याची चर्चा रंगली आहे. 

विद्या बालन आहे एका मुलीची आई, जगापासून लपवले होतं सत्य?, अखेर अभिनेत्रीनेच सांगितलं खरं काय ते

Vidya Balan Secret Daughter: बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन ही नेहमीच चर्चेत असते. मात्र, आता विद्या बालन एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. दोन दिवसांपूर्वी अभिनेत्रीला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. त्याचवेळी तिच्यासोबत एक 14 ते 15 वर्षांची एक मुलगी दिसून आली होती. हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.  विद्यासोबत दिसणारी युवती ही तिचीच मुलगी असल्याचे तर्क लढवले जात होते. 

विद्या आणि त्या मुलीच्या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आले होते. त्यात विद्या तिच्या क्यूट मुलीसोबत असं पॅपाराजीने लिहलं होतं. त्यामुळं ही विद्याचीच मुलगी असल्याची शंका उपस्थित करण्यात आली होती. विद्या बालनची सिक्रेट मुलगी असून तिने जगापासून हे सत्य लपून ठेवले होते का?, असं काहींनी म्हटलं होतं. विद्याच्या मुलीच्या अफवा सुरू झाल्यानंतर अखेर अभिनेत्रीनेच खरं काय ते सांगून चर्चांना पूर्णविराम दिला.

एका वृत्तपत्रेला दिलेल्या माहितीनुसार, विद्याने विमानतळावर तिच्यासोबत असलेल्या मुलीची माहिती दिली आहे. तिने म्हटलं आहे की, ती माझ्या बहिणीती मुलगी आहे. तिला जुळी मुलं आहेत. एक मुलगा रुहान आणि मुलगी ईरा , अशी त्यांची नावे आहेत. 

विद्या आणि तिच्या बहिणीच्या मुलीसोबतचे नाते खास आहे. व्हिडिओत दोघींचे एकमेकांसोबतचे वागणे व बोलणे पाहून या माय-लेकीच आहेत की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र, विद्याने या सगळ्या अफवा असल्याचे सांगत त्यावर पूर्णविराम दिला आहे. 

विद्या बालनने 2012 रोजी एका मुलाखतीत तिच्या आणि फिल्ममेकर सिद्धार्थ रॉय कपूरच्या नात्याविषयी खुलासा केला होता. त्याचवर्षी 14 डिसेंबर रोजी विद्या आणि सिद्धार्थने लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला 11 वर्ष झाली आहेत.  

लग्नाच्या 11 वर्षांनंतर मुलांबाबत काय विचार आहे, असं प्रश्न एकदा विद्याला केला होता. त्यावर रागातच तिने उत्तर दिले होते. मी मुलाना जन्म देणारी मशिन नाहीये, असं तिने म्हटलं होतं. त्याचबरोबर जगात इतकी लोकसंख्या वाढत असताना जर काही लोकांना मुलं नसतील तर त्याच चुकीचे काय आहे?, असा सवाल तिने केला होता. 

विद्याच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, नियत हा तिचा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला होता. मात्र, या सिनेमाला फार काही यश मिळालं नाही. लवकरच विद्या बालनचा लवर्स हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

Read More