Marathi News> मनोरंजन
Advertisement

व्हिडिओ : सैराटचं 'झिंग झिंग झिंगाट' हिंदीत ऐकलं का...

लग्न सोहळा असो किंवा आणखी कोणताही कार्यक्रम असो हे गाणं वाजल्याशिवाय राहत नाही 

व्हिडिओ : सैराटचं 'झिंग झिंग झिंगाट' हिंदीत ऐकलं का...

मुंबई : अख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या आणि जगभरात आपला ठसा उमठवणाऱ्या मराठी सुपरहिट सिनेमाचं हिंदी वर्जन लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. सैराट सिनेमातील झिंग झिंग झिंगाट गाण्याने अनेकांना वेड लावलंय. लग्न सोहळा असो किंवा आणखी कोणताही कार्यक्रम असो हे गाणं वाजल्याशिवाय राहत नाही. हेच गाणं आता हिंदीमध्येही प्रदर्शित करण्यात आलंय. 

दिग्दर्शक शशांक खेतान यांच्या 'धडक' सिनेमाचा नुकताच ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. हा सिनेमा 'सैराट'चा हिंदी रिमेक आहे. या सिनेमातून श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. धडक सिनेमात जान्हवीसोबत शाहीद कपूरचा भाऊ ईशान खट्टर प्रमुख भूमिकेत आहे. सिनेमा २० जुलैला प्रदर्शित होणार आहे.  

दोन वेगवेगळ्या वर्गातील जोडप्याची ही प्रेमकहाणी आणि त्यांचा संघर्ष आहे. जान्हवीचा हा पहिलाचा सिनेमा असला तरी तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. सुपरडुपर हिट मराठी सिनेमा सैराटचा हा रिमेक आहे. सैराटमध्ये दोन्ही प्रेमींना प्रेमाची किंमत जीव देऊन चुकवावी लागते. धडकमध्येही असेच होणार का? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलीय. 

उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी झिंगाट हे गाणं 'कन्नड'मध्येही ऐकायला मिळालं होतं.   

Read More