Marathi News> मनोरंजन
Advertisement

बोल्ड गायिका आणि 'ट्विन्स सिस्टर' बनल्या सोशल मीडिया सेन्सेशन

या ट्विन्स सिस्टर गायिका आपल्या गाण्यासाठी जितक्या प्रसिद्ध आहेत तितक्याच त्या आपल्या बोल्डनेस आणि सुंदरतेसाठीही प्रसिद्ध आहेत

बोल्ड गायिका आणि 'ट्विन्स सिस्टर' बनल्या सोशल मीडिया सेन्सेशन

मुंबई : सोशल मीडियामुळे अचानक कुणाचं नवीन जग उदयास येतं तर कुणाच्या एखाद्या करणीमुळे सगळं कर्तृत्व ट्रोलर्स धुळीत मिळवू शकतात. सोशल मीडियात कधी काय प्रसिद्ध होईल सांगता येत नाही... सध्या दोन जुळ्या बहिणी इंटरनेट जगताचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहेत. त्यांना 'ट्विन्स सिस्टर' म्हणून ओळख मिळालीय. या ट्विन्स सिस्टर गायिका आपल्या गाण्यासाठी जितक्या प्रसिद्ध आहेत तितक्याच त्या आपल्या बोल्डनेस आणि सुंदरतेसाठीही प्रसिद्ध आहेत. या बहिणींची नावं आहेत सुकृती कक्कड (Sukriti Kakkar) आणि प्रकृती कक्कड (Prakriti Kakkar)...

'कहंदी हां, कहंदी ना' हे त्यांचं गाणं सोशल मीडियावर हीट ठरलाय. या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होताना दिसतोय... आणि सोबतच या दोघींच्या प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या अदाही... 

या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर अवघ्या ४८ तासांत यू-ट्यूबवर २५,६८,६६३ व्ह्यूज मिळवण्यात यशस्वी ठरलाय. 

आपण नव्या दमाच्या पण ओरिजनल इंडी-पॉप म्युझिकचा चेहरा ठरलो तर आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया यानंतर ट्विन्स सिस्टरनं व्यक्त केलीय.    

आम्ही दोघींनी मिळून तयार केलेलं हे तिसरं गाणं आहे. हे गाणं आम्हीच कंम्पोज्डदेखील केलंय, असं प्रकृतीनं म्हटलंय. 

या ट्विन्स सिस्टरमुळे कधी कधी प्रेक्षक कन्फ्यूजही होतात. अनेक फॅन्स त्यांना प्रसिद्ध गायिका नेहा आणि सोनू कक्कड समजतात, असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु, नेहा-सोनू या जुळ्या बहिणी नाहीत. 

Read More