Marathi News> मनोरंजन
Advertisement

'एक हिंदू म्हणून...' अयोध्यातील सोहळा पाहून स्वप्निल जोशी झाला भावूक

राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पाहून प्रत्येकाचे डोळे भरून आले. अनेक वर्षांनंतर या शुभ प्रसंगी प्रत्येकजण आपापल्या परीने आपल्या भावना व्यक्त करत आहे. या निमित्ताने बॉलिवूडपासून ते टेलिव्हिजनपर्यंतच्या स्टार्सनी अनेक पोस्ट्स केल्या आहेत.  

'एक हिंदू म्हणून...' अयोध्यातील सोहळा पाहून स्वप्निल जोशी झाला भावूक
Updated: Jan 22, 2024, 03:58 PM IST

मुंबई : सध्या संपुर्ण देश राममय झाला आहे. या भव्यदिव्य सोहळ्याचे केवळ अयोध्यामध्येच नव्हेतर सगळ्या जनतेमध्ये हा रामसोहळा साजरा केला जातोय. मुख्य म्हणजे या सोहळ्याची क्रेझ लहान मुलांमध्येही पहायला मिळत आहे. हा सोहळा आज प्रत्येकजण घरा-घरांत दिवाळीप्रमाणे हा सोहळा साजरा करत आहेत. आज अयोध्येत भगवान श्री रामाचा प्राण प्रतिष्ठासोहळा सुरु असून  हे मंदिर सामन्य जनतेसाठी खुले होणार आहे. या भव्यदिव्य सोहळ्याला केवळ राजकिय नेतेच नाहीतर सेलिब्रिटीदेखील हजर होते. तर अनेक सेलिब्रिटी त्यांच्या सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत. मात्र आता अशातच मराठमोळा अभिनेता स्वप्निल जोशीने त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

स्वप्निल जोशीने शेअर केलेल्या या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये स्वप्निलने लिहीलंय की, ''मी उत्तर रामायण या मालिकेत भगवान श्री रामाचा मुलगा कुशची भूमिका साकारली होती. माझ्या नशिबाने ही संधी मला लहान वयातच मिळाली! माझ्या आयुष्यातील हा एक अद्भुत काळ होता! भगवान श्री रामजींच्या चरणी एक छोटीशी सेवा अर्पण करतो! आज, अयोध्येच्या पवित्र भूमीत, जेव्हा श्री राम मंदिराचे उद्घाटन होत आहे, एक हिंदू, एक भारतीय म्हणून, तो माझ्या आयुष्यातील परम आनंदाचा क्षण आहे. सियावर रामचंद्र की जय ! सीता मैया की जय ! पवनसूत हनुमानजी की जय !''

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांनी या व्हिडीओवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तर अनेकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहरेने कमेंट करत 'जय श्री राम' असं लिहीलं आहे तर अजून एकाने कमेंट करत लिहीलंय की, सगळ्यांना कायम लक्षात राहील अशी भूमिका 'जय श्री राम'. तर अजून एकाने लिहीलंय, मी आणि माझी मूलं तुमच्या अक्षरश: प्रेमात पडलो आहोत.. आधीच मी तुझा खूप मोठा चाहता आहोत.. पण यानंतर माझ्यातला चाहता आणखीनच मोठा झाला आहे. तर अनेकजण  'जय श्री राम' म्हणत या व्हिडीओवर कमेंट करत आहेत. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.